व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भव्य बैलगाडा शर्यत.. कुस्तीचा जंगी आखाडा आणि मनोरंजनाची मेजवानी! टाकवे गावच्या यात्रेला जल्लोषात सुरुवात

मावळ तालुक्यातील मोठ्ठे आणि पुढाऱ्यांचे गाव असलेल्या टाकवे बुद्रुक गावची यात्रा दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात सुरु झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 22, 2024
in लोकल, ग्रामीण
Takve-Budruk-Village-Yatra

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील मोठ्ठे आणि पुढाऱ्यांचे गाव असलेल्या टाकवे बुद्रुक गावची यात्रा दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात सुरु झाली आहे. यंदा उत्सव समितीने अनेक कार्यक्रमाचे नियोजन केले असून त्यात भव्य बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा जंगी आखाडा, मनोरंजनाचे कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम आहेत. बुधवारी (दि. 14) वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर गावातील मुख्य मंदीरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. ह.भ.प. गुरुवर्य वैराग्यमूर्ती शंकर महाराज मराठे भामचंद्र निवासी ह्यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाला आणि जत्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

रविवार (दि. 11) या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात गावातील सर्वजण सहभागी झाले होते. रथ, ढोल ताशे, बॅन्जो, उंट, घोडे हे मिरवणूकीचे प्रमुख आकर्षण होते. महिलांनी आणि पुरुषांनी पारंपारिक पोषाक परिधान केले होते. महिला मंडळींनी डोक्यावरती तुळशी घेऊन, फेर धरून अभंग गात होत्या. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व भाविक मिरवणूकीत सहभागी झाले होते. (Vitthal Rukmini Idol Pran Pratistha and Yatra in Takve Budruk village Andar Maval)

टाकवे गावची यात्रा ही वसंत पंचमीच्या मुहूर्तावर सुरु होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा नंतर दरवर्षीप्रमाणे इतरही कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. आंदर मावळ परिसराची आर्थिक राजधानी असा टाकवे गावचा नावलौकिक आहे. त्यामुळे टाकवे गावच्या यात्रेला पंचक्रोशीतील नागरिक येतात. बैलगाडा मालक बैलगाडा शौकीन पैलवान यात्रेला हजेरी लावतात. तत्पूर्वी सात दिवस अगोदर अखंड हरिनाम सप्ताहात वारकरी मंडळी भेटी देतात. त्यावेळी संपूर्ण मंदिर पुर्ण परिसरात भक्तिमय वातावरण असते. यंदा गावातील मुख्य मंदिरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम असल्याने दिनांक 14 ते 18 तारखेपर्यंत शुद्ध शाकाहारी जेवण बनवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

यात्रेत कार्यक्रमाचे भरगच्च नियोजन –
दि-14 श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
रात्री मनोरंजनसाठी पवळेवाडी भारुड
दि-15, भव्य बैलगाडा शर्यत,आर्केस्ट्रा
दि-16 भव्य कुस्ती आखाडा,आर्केस्ट्रा
दि-17 भव्य बैलगाडा शर्यत
दि-18 भव्य बैलगाडा शर्यत

अधिक वाचा –
– वडगाव येथे गुरुवारी मावळ तालुक्याची आमसभा! आमसभा म्हणजे काय? आमसभेचे कामकाज कसे चालते? जाणून घ्या । Sunil Shelke Amasabha
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावात गुरूवारी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांबाबत जनजागृती शिबिराचे आयोजन । Maval News
– तळेगाव येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते नवनियुक्त कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान । Talegaon Dabhade


Previous Post

‘तालुक्याचं गाव पण विजेचा बारा महिने लपंडाव’, वडगाव शहरातील वीज विषयक समस्यांबाबत राष्ट्रवादीचे महावितरणला निवेदन । Vadgaon Maval

Next Post

राज्यात ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्रीचे दर निश्चित करणार; शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde

राज्यात 'ना नफा, ना तोटा' तत्त्वावर वाळू विक्रीचे दर निश्चित करणार; शिंदे सरकारचे एकापेक्षा एक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.