व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, October 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव येथे गुरुवारी मावळ तालुक्याची आमसभा! आमसभा म्हणजे काय? आमसभेचे कामकाज कसे चालते? जाणून घ्या । Sunil Shelke Amasabha

मावळ तालुक्याची 2023-24 या आर्थिक वर्षातील आमसभा आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 15 फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात होणार आहे. Maval Taluka MLA Sunil Shelke Amasabha General Meeting Information In Marathi.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 14, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Sunil-Shelke-Amasabha

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्याची 2023-24 या आर्थिक वर्षातील आमसभा आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 15 फेब्रुवारी) सकाळी साडेदहा वाजता वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात होणार आहे. आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषदेत या आमसभेबाबत पूर्वीच घोषणा केली होती. मावळ तालुक्यातील सर्व गावांसाठीचे ‘शासन आपल्या दारी’ अभियान पार पडल्यानंतर आता दिनांक 15 फेब्रुवारीला मावळ तालुक्यातील मागील पाच वर्षातील ही पहिली आमसभा होणार आहे. परंतू आमसभा म्हणजे काय? त्याचे कामकाज कसे चालते? याबाबत नागरिकांना तितकी माहिती नाही. त्यामुळे या लेखातून आपण आमसभा बद्दल विस्तृतरित्या समजून घेणार आहोत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

आमसभा म्हणजे काय?
भारत हा खेड्यांचा अर्थात गावांचा देश आहे. अनेक गावे मिळून हा देश बनलेला आहे. गावखेड्यांच्या व्यवस्थेला देशात पंचायतराज म्हणून ओळखलं जातं. ग्रामपंचायत हा या पंचायतराजचा मुलाधार आहे. ग्रामपंचायतचे कामकाम जसे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्राम सदस्य मिळून करतात आणि त्यांच्यावर ग्रामसभेद्वारे संपूर्ण मतदार अंकूश ठेवत असतात, अगदी तसेच विधानसभा मतदारसंघाचे कामकाम हे आमदार, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून करत असतात. आणि तालुक्यातील अथवा विधानसभेतील सर्व मतदार आमसभेद्वारे संबंधितांवर अंकूश ठेवतात. परंतू ग्रामसभा आणि आमसभा यांचे कार्यपद्धती पूर्णतः वेगळी असते. महत्वाचा फरक म्हणजे घटनेनुसार ग्रामसभेचे जसे नियम आहेत, तसे आमसभेबाबत नाही. म्हणजे आमसभा बोलावणे आणि त्याचे कार्यचलन करणे यासाठी कुठलेही बंधन नसते. परंतू आमसभा बोलावणे आणि तिची कार्यपद्धती याबाबत काही नियम आहेत.

आमसभा कोण बोलवतो?
तसे पाहता आमसभा ही पंचायत समितीची असते. पंचायत समिती आमसभेचे संपूर्ण आयोजन नियोजन करत असते. आणि गटविकास अधिकारी आमसभेचे सचिव या नात्याने सर्वविभागांशी संपर्क करत असतात. परंतू तालुक्याचे अथवा विधानसभेचे आमदार हे आमसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आणि आमदार यांनी वेळ दिल्यानंतर किंवा त्यांनी सुचना केल्यानंतरच आमसभा बोलवली जाते.

आमसभेचे कामकाज कसे चालते?
आमसभेत आपण वर सांगितल्याप्रमाणे सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचार आणि मतदार नागरिक असतात, जे तालुक्यातील अथवा विधानसभा क्षेत्रातील सर्व दूर भागातून आलेले असतात. आमदार हे या आमसभेचे अध्यक्ष असल्याने ते सर्वोच्चस्थानी असतात. अशात प्रत्यक्ष आमसभेच्या कामकाजात प्रत्येक विभागाचा मागील वर्षाच्या कामाचा आढावा जाहीर करणे आणि येत्या वर्षातील कामाचे नियोजन जाहीर करणे, हे काम प्रत्येक विभागनिहाय आमसभेत होते. याचा अर्थ तालुक्यातील जनतेला प्रत्येक विभागाच्या कामाचा गत वर्षीचा आढावा समजतो आणि भविष्यात होणाऱ्या कामांची मागिती होते. ही प्रक्रिया सर्वविभागनिहाय होत असते.

नागरिकांचा आमसभेतील सहभाग –
आमसभेला तालुक्यातील म्हणजेच विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार उपस्थित राहू शकतात किंबहुना राहतात. अशावेळी विभागांच्या आढावा सादर झाल्यानंतर नागरिक प्रत्येक विभागानुसार आपले प्रश्न उपस्थित करू शकतात. तसेच आपले मुद्दे मांडू शकतात. अध्यक्ष म्हणून आमदार यांच्या उपस्थितीत हे सर्व कामकाज पाहिले जाते.

अध्यक्ष म्हणून आमदार महोदयांचा सहभाग –
आमदार हे आमसभेचे अध्यक्ष असतात. संपूर्ण आमसभा ही त्यांच्या सुचनेने होत असल्याने संपूर्ण आमसभेत ते सक्रीय सहभाग घेतात. विभागांचा आढावा सादर होत असताना ते आपल्या सुचना देऊ शकतात. तसेच नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान विभागीय अधिकाऱ्यांकडून होत नसल्यास ते स्वतः हस्तक्षेप करू शकतात.

आमसभेचे फायदे –
आमसभा ही एका आर्थिक वर्षाकरिता असते. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात आमसभा होणे गरजेचे आहे. आमसभेमुळे जनतेला प्रत्यक्षात सर्व विभागांच्या कामांची माहिती होते आणि कामात पारदर्शकता निर्माण होते. तसेच जनतेला थेट अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधता येतो आणि आपले प्रश्न, समस्या मांडता येतात.

मावळ तालुक्याची आमसभा –

गुरुवार (दि. 15 फेब्रुवारी) रोजी वडगाव येथील भेगडे लॉन्समध्ये मावळ तालुक्याची आर्थिक वर्ष 23-24 ची आमसभा होणार असल्याची माहिती मावळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (प्रभारी) सुधीर भागवत यांनी दिली. आमसभेला तहसीलदार विक्रम देशमुख यांसह तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत, आणि आपापल्या विभागाच्या कार्याचा आढावा जनतेसमोर सादर करणार आहेत. तालुक्यातील नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी आमसभेचे अध्यक्ष आणि आमदार या नात्याने आणि गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांनी आमसभेचे सचिव या नात्याने नागरिकांना केले आहे. बऱ्याच वर्षांनंतर तालुक्याची आमसभा होत असल्याने मावळकरांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

अधिक वाचा –
– पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ दिवशी जमा होणार 16वा हप्ता, लाभार्थ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिम । PM Kisan Yojna
– वडगाव शहरातील 300 मुलांना मोरया प्रतिष्ठानने घडवली तोरणा किल्ल्याची सफर । Vadgaon Maval
– मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बुधवारी पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यात भव्य रॅलीचे आयोजन, पाहा रॅलीचा मार्ग


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील ‘या’ गावात गुरूवारी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांबाबत जनजागृती शिबिराचे आयोजन । Maval News

Next Post

‘अर्थ समजून घेत प्रेम व्यक्त करुया…’, व्हॅलेंटाईन डे बद्दल तरुणाईच्या ‘मन की बात’ नक्की वाचा । Valentine’s Day 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Valentine-Day-2024

'अर्थ समजून घेत प्रेम व्यक्त करुया...', व्हॅलेंटाईन डे बद्दल तरुणाईच्या 'मन की बात' नक्की वाचा । Valentine's Day 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Distribution of books to students on occasion of birth anniversary of late Pandharinath Satkar kanhe maval

स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तकसंचांचे वाटप

October 28, 2026
Successful follow-up by Bala Bhegade government takes positive step toward declaring Maval drought-affected taluka

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

October 27, 2026
Ravindra Bhegade met with CM devendra fadanvis to request an early meeting regarding Pavana farmer

पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकर बैठक घेण्याबाबत रवींद्र भेगडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

October 27, 2026
Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.