व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काळीज तोडणारी घटना… धनगव्हाण गावात गोठ्याला आग लागल्याने दोन जनावरांचा होरपळून मृत्यू, साठवलेला चाराही जळाला

पवनमावळ भागातील धनगव्हाण गावातील शेतकरी लक्ष्मण नथू घारे यांच्या शेतावरील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत एक गाई, एक बैलाचा होरपळून मृत्यु झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 16, 2024
in लोकल, ग्रामीण
Cowshed-Fire-Maval-Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवनमावळ भागातील धनगव्हाण गावातील शेतकरी लक्ष्मण नथू घारे यांच्या शेतावरील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत एक गाई, एक बैलाचा होरपळून मृत्यु झाला आहे. तर तीन जनावरे होरपळून मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. यासह साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला आहे. घारे याच्या शेतावरील गोठ्याला अचानक लागलेल्या आगीमुळे लाखो रुपयांचे नुसकान झाले आहे. तर सर्जाराजाची जोडी तुटल्याने गरीब शेतकऱ्याच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

घारे यांनी सकाळी शेतावरील गोठ्यात पाच जनावरांना पाणी पाजून बांधून ठेवली होती. त्यानंतर इतर कामानिमित्त घारे बाहेरगावी आल्याने अचानक ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास अचानक गोठ्याला आग लागली त्यावेळी त्या ठिकाणी घरातील कोणी नसल्याने जनावरांना जीव गमवावा लागला. यात वर्षाभरासाठी साठवून ठेवलेला चारा ही जळून खाक झाला आहे. (Cow and Bull Died in Cowshed Fire Dhangwan Village Maval Taluka)

जखमी पडलेल्या जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी यांनी औषधोपचार सुरु केला असून जनावरांना मोठ्या प्रमाणावर जखम झाली असल्याने युद्ध पातळीवर वैद्यकीय सेवा सुरु आहे. महसूल विभागाचे तलाठी सचिन जाधव आणि रामदास कदम यांनी याबाबत पंचनामा केला असुन पुढील कार्यवाही साठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. तरी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सर्जाराजाची तुटली जोडी –
घारे यांच्या कडे शेतीची कामे करण्यासाठी एकरंगी एक शिंगे बैलाची जोडी होती. पंरतु काल अचानक लागलेल्या आगिमुळे सर्जाराजा मधील एकाचा होरपळून मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. त्यावर औषधोपचार सुरू आहे. ऐन शेतीच्या कामामध्ये सर्जा राजाची जोडी तुटल्याने घारे कुंटब मोठ्या संकटात सापडले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांरी मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! अजित पवारांचे सर्व आमदार पात्र, राहुल नार्वेकर यांचा निकाल, शरद पवार गटाचं काय झालं? वाचा सविस्तर
– निमगाव येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी लिफ्टची सोय करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश । Pune News
– तळेगाव दाभाडे येथील कैकाडी समाजाच्या समस्या तातडीने सोडवा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश । Talegaon Dabhade


Previous Post

।। राम कृष्ण हरी ।। श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण आणि कीर्तन महोत्सवानिमित्त अखंड अन्नदान सेवा

Next Post

ग्रामपंचायत महागाव, भोयरे आणि पिंपरी येथे शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबद्दल मार्गदर्शन । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Guidance-session-for-farmer

ग्रामपंचायत महागाव, भोयरे आणि पिंपरी येथे शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबद्दल मार्गदर्शन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Raigad News Lost mobile phone recovered Khopoli police efforts successful joy on faces of 40 citizens

Khopoli News : हरवलेले मोबाईल पुन्हा हातात ; खोपोली पोलिसांच्या प्रयत्नांना यश, ४० नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद

May 25, 2026
Fort conservation campaign completed at Tikona Fort in Pawan Maval area

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, सह्याद्री आणि मी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळातील तिकोणा गडावर दुर्गसंवर्धन मोहीम

May 25, 2026
Pavana-Dam

Pawana Dam Update । पवना धरणात २७ टक्के पाणीसाठा ; ‘या’ तारखेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

May 25, 2026
Maval Taluka Congress party demands strict action against culprits in NEET paper leak case

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाची मागणी

May 25, 2026
Forced sale of non-subsidized fertilizers along with subsidized fertilizers stopped Agriculture Minister Dattatreya Bharane

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद

May 25, 2026
Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

May 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.