व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळमधील शिळींब गावात शिवजयंती जल्लोषात साजरी; विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तनासाठी पंचक्रोशीतील शिवभक्तांची हजेरी

सालाबादप्रमाणे याही वर्षी पवन मावळ भागातील मौजे शिळींब गावात शिवराय फ्रेंड्स सर्कल गावठाण या मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सवाचा सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 20, 2024
in लोकल, ग्रामीण
Shiv-Jayanti-2024

Photo Courtesy : Team Dainik Maval


सालाबादप्रमाणे याही वर्षी पवन मावळ भागातील मौजे शिळींब गावात शिवराय फ्रेंड्स सर्कल गावठाण या मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सवाचा सोहळा अत्यंत थाटामाटात साजरा करण्यात आला. शिवराय फ्रेंड्स सर्कलचे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे हे सातवे वर्षे होते. यंदा सोमवारी (दि. 19 फेब्रुवारी) छत्रपती शिवरायांची तारखेप्रमाणे 394वी जयंती होती. तसेच यंदाचे हे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळ्याचे साडेतीनशे वे वर्ष आहे. त्यामुळे मंडळाकडून शिवजयंतीसाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन अशा कार्यक्रमाचे जंगी नियोजन करण्यात आले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

सकाळी 5 वाजता शिळींब येथून निघून शिवराय फ्रेंड्स सर्कलच्या शिवभक्तांनी किल्ले तिकोणा येथे जात शिवज्योत आणली. सकाळी 10 वाजता 50 हून अधिक शिवभक्त यांनी शिवज्योत गावात आणली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात शिवज्योतीचे गावात स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिवप्रतिमेचे पूजन करून सामुहिक शिववंदना आणि महाआरती घेण्यात आली. (Shiv Jayanti 2024 celebrated with gaiety at Shilimb village in Pavan Maval)

त्यानंतर सर्वात आकर्षणाचा भाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. तब्बल 4 तास चाललेल्या या कार्यक्रमात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. यात लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांचाच सहभाग होता. तसेच विजेत्यांना अनेक आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी प्रथमच मंडळाच्या माध्यमातून होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यात पहिल्या पैठणीच्या मानकरी सौ. आश्विनी रोहिदास कुंभार या ठरल्या.

त्यानंतर सायंकाळी ढोल, ताशाच्या गजरात पारंपारिक पद्धतीने शिवप्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक काढल्यात आली. यावेळी महिलांनी फेर धरत फुगड्या खेळत सहभाग नोंदवला. त्यानंतर सायंकाळी सामुदायिक हरिपाठ, हरिजागर होऊन पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. रुचिताताई कुंभार (कोथूर्णे) यांची सुवाश्र्य कीर्तनसेवा झाली. यावेळी हजारो शिवभक्त, भाविक, नागरिक उपस्थित होते. त्यानंतर शिवराय फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आलेल्या सर्व शिवभक्तांना महाप्रसाद अर्थात जेवणाची सोय करण्यात आली होती. शिवराय फ्रेंड्स सर्कलच्या सर्वच शिवभक्तांनी सालाबादप्रमाणे यंदाही जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून उर्से आणि परंदवडी गावातील ठाकर समाजातील 90 नागरिकांना मिळाले जात प्रमाणपत्र
– आरोग्य विभागातील 10 हजार 949 रिक्त पदांची भरती प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू – आरोग्य मंत्री तानाजी सावंत
– मावळात खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीतून दिसणार महायुतीची ताकद! 19 पैकी 10 जागा आधीच बिनविरोध । Maval Taluka Kharedi Vikri Sangh


dainik maval jahirat

Previous Post

कात्रजमधून अपहरण केलेल्या तरुणाची लोणावळ्यातून सुटका, खंडणीसाठी केले होते अपहरण । Pune News

Next Post

मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय घेतलाय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Maratha Reservation Bill

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maratha-Reservation-Bill-Pass

मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक, धाडसी आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा निर्णय घेतलाय - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । Maratha Reservation Bill

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.