व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळकन्येची दमदार कामगिरी! वेदांगी असवले हिने मिळवला आंदर मावळातून प्रथम सीए बनवण्याचा मान । Maval News

अशाप्रकारे यश संपादन करणारी आंदर मावळातील पहिली चार्टर्ड अकाउंटट्स होण्याचा मान वेदांगीने प्राप्त केला आहे. Vedangi Aswale From Andar Maval Division Became Chartered Accountant.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 22, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
CA-Vedangi-Aswale

Photo Courtesy : Team Dainik Maval


दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) गेल्या नोव्हेंबरमध्ये घेण्यात आलेल्या सीएच्या (Chartered Accountant) अंतिम परीक्षेत मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील वेदांगी नारायण असवले (Vedangi Aswale) पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. वेदांगीला 800 पैकी 495 गुण प्राप्त झाले असून तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळवले आहे. देशभरातून 32 हजार 907 विद्यार्थी सीएच्या परीक्षेसाठी बसले होते. आयसीएआयने जाहीर केलेल्या निकालानुसार त्यात केवळ 9.42 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वेदांगी ही तळेगाव दाभाडे येथील माउंट सेन्ट अॅन हायस्कूलची त माजी विद्यार्थिनी आहे. मार्च सीबीएसई परीक्षेत तिला 95.40 टक्के गुण मिळाले होते. बी. कॉम. परीक्षेतही तिने 85.56 टक्के गुणांसह ग्रेड ए पल्स (सीजीपीए 8.68) स्कोअर केला. आयसीएआयतर्फे सन 2022 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेत वेदांगीने सादर केलेल्या शोध प्रबंधाखातर तिला बेस्ट पेपर प्रेझेंटर अवॉर्ड मिळाले होते. कुडोस अवॉर्ड प्राप्त वेदांगीला अनहेडेड परकीय चलन, वार्षिक आर्थिक अहवाल, लष्करी कामकाजाच्या निविदा, लिस्टेड कंपन्यांचे अहस्तांतरणीय डिबेंचर्स यांचे नियोजन ते पूनर्वलोकनाबाबत आवश्यक असलेल्या भारतीय रिझर्व बँक प्रमाणपत्र प्रमाणीकरणाशी संबंधित कामासाठीही पारितोषिक मिळाले आहे.

“श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तुकाराम असवले व हभप सुभाष असवले यांची पुतणी आणि मावळ तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण असवले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बु. मुख्याध्यापिका वंदना नारायण असवले या शिक्षक दाम्पत्याची सुकन्या वेदांगी असवले हिने सी. ए. परीक्षेत उत्तुंग यश संपादन करून टाकवे बुद्रुक व असवले परिवाराचे नाव उज्जवल केले.”

अशाप्रकारे यश संपादन करणारी आंदर मावळातील पहिली चार्टर्ड अकाउंटट्स होण्याचा मान वेदांगीने प्राप्त केला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना असवले आणि शिक्षक नारायण असवले यांची ती कन्या असून तिने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसमोर एक आदर्श ठेवला आहे. (Vedangi Aswale From Andar Maval Division Became Chartered Accountant)

अधिक वाचा –
– कान्हे सोसायटीच्या चेअरमनपदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांची निवड । Maval News
– हृदयद्रावक घटना! द्रुतगती मार्गावरील कार अपघातात तळेगावमधील एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, 5 जखमी । Accident on Mumbai Pune Expressway
– ठरलं तर..!! दिनांक 26 फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, ‘या’ तारखेला सादर होणार अंतरिम अर्थसंकल्प । Maharashtra Budget Session 2024


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन । National Lok Adalat

Next Post

इंद्रायणीच्या डोहात उडी मारून अज्ञात व्यक्तीची आत्म’हत्या । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Unknown-Dead-Body

इंद्रायणीच्या डोहात उडी मारून अज्ञात व्यक्तीची आत्म'हत्या । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.