नाणे मावळातील वळक गावात बुद्ध विहार बांधण्यात येणार असून या कामाचा भूमिपूजन समारंभ स्थानिकांच्या उपस्थितीत गुरुवार (दि. 22 फेब्रुवारी) संपन्न झाला. आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून ग्रामविकास निधी 2023-24 अंतर्गत वीस लाख रुपये निधी उपलब्ध झाला आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून होत असलेल्या मागणीनुसार एक हजार स्क्वेअर फुटामध्ये आरसीसीचे बांधकाम होणार आहे. तसेच सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
ह्या कामाच्या भूमिपूजन समारंभाला सामाजिक कार्यकर्ते सनी जाधव, उपसरपंच सुनिल बांगर, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव बांगर, संदीप जाधव, अमोल थोरवे, मच्छिंद्र थोरवे, रोहिदास वाघमारे, सागर रणपिसे, प्रल्हाद जाधव, अर्जुन रणपिसे, राजेंद्र रणपिसे, बबन जाधव, गुलाब जाधव आदी ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या. ( Bhoomi Pujan of New Buddha Vihar at Valak village in Nane Maval )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन । National Lok Adalat
– टाकवे येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दीड किलो चांदीचे अलंकार अर्पण । Maval News
– कान्हे सोसायटीच्या चेअरमनपदी मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर सातकर यांची निवड । Maval News