लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ लायन्स पॉइंट येथे दरीत कोसळलेल्या 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह शोधण्यात शिवदुर्ग मित्रच्या सदस्यांना यश आले आहे. बुधवारी (दि. 21 फेब्रुवारी) रोजी सायंकाळच्या सुमारास ही मुलगी दरीत कोसळली होती. ती दरीत कोसळली की तीने उडी मारली. याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे. परंतू, तिथे असलेल्या व्यावसायिकांना तिची चप्पल आणि बॅग सापडली, त्यानंतर त्यांनी शिवदुर्ग टीम आणि पोलिसांशी संपर्क केला. बुधवारी रात्र झाल्याने शोधकार्य करता आले नाही. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
परंतू आज, गुरुवारी (दि. 22 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास शिवदुर्गच्या टीमने अथक प्रयत्नांनी सदर तरुणीचा मृतदेह दरीतून वर काढला. साक्षी रमेश होरे (वय 20) असे सदर मृत तरुणीचे नाव असून ती पुणे जिल्ह्यातील दावडी गावातील रहिवासी होती, असे समजते. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याची शंका व्यक्त केली जात असून लोणावळा ग्रामीण पोलिस याबद्दल पुढील तपास करत आहेत. (20 year old girl died after falling into a ravine at Lions Point near Lonavala)
शिवदुर्ग मित्र टीमचे योगेश उंबरे, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, योगेश दळवी, महेश मसने, आदित्य पिलाने, सिध्देश निसाळ, कुणाल कडु, अशोक उंबरे, यश सोनावणे, विनायक शिंदे, मयुर दळवी, रमेश कुंभार, गौरव कालेकर, कपिल दळवी, समीर देशमुख, अशोक उंबरे, राजेंद्र कडु, आयुष वर्तक, अनिल आंद्रे आणि सुनिल गायकवाड सुनिल गायकवाड तसेच लोणावळा ग्रामीणचे पोलिस यांनी या बचाव तथा शोधकार्यात सहभाग घेतला.
अधिक वाचा –
– मावळकन्येची दमदार कामगिरी! वेदांगी असवले हिने मिळवला आंदर मावळातून प्रथम सीए बनवण्याचा मान । Maval News
– पुणे जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन । National Lok Adalat
– टाकवे येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला दीड किलो चांदीचे अलंकार अर्पण । Maval News