व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरात 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी आणि पीयूसी प्रमाणपत्र वाटप । Vadgaon Maval

वडगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव शहरात बुधवारी (दि. 21) 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 22, 2024
in लोकल, शहर
free-air-pollution-test

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव नगरपंचायतीचे माजी नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव शहरात बुधवारी (दि. 21) 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी करण्यात आली. तसेच सर्व वाहनधारकांना मोफत पीयूसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक तथा वडगाव शहर भाजपाचे कार्याध्यक्ष प्रसाद अरविंद पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव भाजपाच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वडगाव मावळ शहरातील चावडी चौक येथे दुचाकी, तीनचाकी (रिक्षा) वाहनांसाठी हा मोफत वायू प्रदूषण चाचणी उपक्रम राबवण्यात आला. शहरातील एकूण 112 वाहनधारकांनी यावेळी लाभ घेतला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाहनधारकांना तत्काळ पीयूसी सर्टिफिकेटही देण्यात आले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी सर्व वाहन चालकांना पीयूसी प्रमाणपत्र बद्दल विस्तृत माहिती दिली आणि महत्व समजून सांगितले. तर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी सर्वांचे आभार मानले. ( free air pollution test of 112 vehicle and puc certificate distribution in vadgaon maval )

ह्यावेळी ज्येष्ठ नेते अरविंद पिंगळे, पंढरीनाथ भिलारे, सोमनाथ काळे, दीपक बवरे, प्रदीप बवरे, प्रवीण चव्हाण, ॲड. विजयराव जाधव, शामराव ढोरे, रवींद्र काकडे, भूषण मुथा, शंकरराव भोंडवे, रविंद्र म्हाळसकर, मकरंद बवरे, सचिन ढोरे, निलेश म्हाळसकर, ॲड. अजित वहिले, नितीन कुडे, संभाजीराव म्हाळसकर , सुधाकर ढोरे, बाळासाहेब वाघमारे, विजयराव सुराणा, बाळासाहेब भालेकर, गणेश विनोदे, रामदास वाडेकर, प्रशांत चव्हाण, संतोष ढोरे, हेमंत काकडे, शिवाजीराव असवले, नामदेवराव ढोरे, नंदकुमार जाधव, महेंद्र म्हाळसकर, संतोष भालेराव, मनोज जाधव, मनोज पोफळे, गणेश भेगडे, महेंद्र अ. म्हाळसकर, संतोष म्हाळसकर, सतीश म्हाळसकर, सुरेंद्र बाफना, दीपक पवार, विकास पिंगळे, रिचा पिंगळे, श्लोक पिंगळे, वरद पिंगळे, स्वानंद भालेकर, देवेश भालेकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पुणे जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन । National Lok Adalat
– मावळकन्येची दमदार कामगिरी! वेदांगी असवले हिने मिळवला आंदर मावळातून प्रथम सीए बनवण्याचा मान । Maval News
– पुणे जिल्हा न्यायालय आणि सर्व तालुका न्यायालयांमध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन । National Lok Adalat


Previous Post

लोणावळा जवळील लायन्स पॉइंट येथे दरीत कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू । Lonavala News

Next Post

शासनाच्या ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात कान्हे शाळा तालुक्यात अव्वल! जिल्हा स्तरावर बाजी मारण्यासाठी शाळेची तयारी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
ZP-School-Kanhe-Maval-Taluka

शासनाच्या 'माझी शाळा - सुंदर शाळा' उपक्रमात कान्हे शाळा तालुक्यात अव्वल! जिल्हा स्तरावर बाजी मारण्यासाठी शाळेची तयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.