व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शासनाच्या ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात कान्हे शाळा तालुक्यात अव्वल! जिल्हा स्तरावर बाजी मारण्यासाठी शाळेची तयारी

'माझी शाळा - सुंदर शाळा' उपक्रमात जिल्हा परिषदेची तालुक्यातील आदर्श शाळा असलेल्या कान्हे शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत तीन लाखाचे पारितोषिक आपल्या नावे केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 22, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
ZP-School-Kanhe-Maval-Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत मावळ तालुक्यातील कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेने तालुकास्तरावर चमकदार कामगिरीची नोंद करत अव्वल नंबर पटकावला आहे. ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात जिल्हा परिषदेची तालुक्यातील आदर्श शाळा असलेल्या कान्हे शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत तीन लाखाचे पारितोषिक आपल्या नावे केले आहे. शाळेच्या ह्या यशाबद्दल मुख्याध्यापक, सर्व अध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

कान्हे शाळेने अगोदर केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यानंतर तालुका स्तरावर झालेल्या तपासणी दरम्यान मावळ तालुक्यातून सर्वाधिक 96 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. यासह कान्हे शाळा तीन लाखाच्या बक्षीसास पात्र ठरली आहे. मावळ तालुक्यात यशस्वी घोडदौड केल्यानंतर पुणे जिल्हा स्तरावरही बाजी मारण्यासाठी कान्हे शाळेने तयारी सुरु केली आहे. (Zilla Parishad Kanhe School ranked first in Maval Taluka in Mazi Shala Sundar Shala Activity)

ह्यात कान्हे गाव ग्रुप ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक, परिसरातील सीएसआर फंड देणाऱ्या विविध कंपन्या, सेवाभावी संस्था ह्यांचे मोलाचे सहकार्य विद्यार्थी आणि शिक्षकांना लाभल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेच्या यशस्वितेसाठी सतत मार्गदर्शन करणारे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत, गट शिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख अजित नवले या सर्वांचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

गुरुवारी (दि. 22 फेब्रुवारी) कान्हे शाळेची पुणे जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा पथकाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी काळे साहेब, डायटचे अधिव्याख्याता प्रभाकर क्षीरसागर साहेब यांनी शाळेचे मूल्यांकन केले. तसेच शाळेच्या सर्व भौतिक सुविधा आणि सर्व रेकॉर्ड तसेच गुणवत्ता याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करत कान्हे शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा –
– वळक गावात बांधले जाणार भव्य बुद्ध विहार, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 20 लाखांचा निधी मंजूर, भूमिपूजनही संपन्न
– इंद्रायणीच्या डोहात उडी मारून अज्ञात व्यक्तीची आत्म’हत्या । Talegaon Dabhade
– मावळकन्येची दमदार कामगिरी! वेदांगी असवले हिने मिळवला आंदर मावळातून प्रथम सीए बनवण्याचा मान । Maval News


Previous Post

वडगाव शहरात 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी आणि पीयूसी प्रमाणपत्र वाटप । Vadgaon Maval

Next Post

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटींचा निधी उपलब्ध

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Agriculture-Minister-Dhananjay-Munde

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटींचा निधी उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.