केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ असे नाव यापूर्वीच दिले आहे. हेच नाव पुढील आदेशापर्यंत उपयोगात आणण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच या आदेशावेळी निवडणूक आयोगाने 7 दिवसांच्या आत शरद पवार यांच्या पक्षाला चिन्ह देण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार आज (दि. 2) आयोगाने शरद पवार गटाला नवे चिन्ह (Sharad Pawar Party New Symbol) दिले आहे. ‘तुतारीवाला माणूस’ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला दिले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. या गटात पुढे खरी राष्ट्रवादी कोणाची हा दावा उभा राहिला. यात अजित पवार गट यांचा विजय झाला. आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह मिळाले. मात्र शरद पवार गटाला नवे नाव देण्यात आले.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव शरद पवार गटाला देण्यात आले होते. मात्र अद्याप चिन्ह मिळाले नव्हते. परंतू आता ‘तुतारीवाला माणूस’ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला दिले आहे. निवडणूक आयोगाने तसे पत्र पाठवले आहे. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष याच चिन्हावर आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ ह्या नावावर निवडणूक लढवेल. ( Tutarivala Manus Sharad Pawar Party Allotted New Election Symbol By Election Commission )
“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे पुढील निर्देश येईपर्यंत ‘तुतारीवाला माणूस’ हेच शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह असणार आहे. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव आणि चिन्ह म्हणून ‘तुतारीवाला माणूस’ यावरच कदाचित शरद पवार गटाला आगामी काही निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.
अधिक वाचा –
– वडगाव शहरात 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी आणि पीयूसी प्रमाणपत्र वाटप । Vadgaon Maval
– लोणावळा जवळील लायन्स पॉइंट येथे दरीत कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू । Lonavala News
– वळक गावात बांधले जाणार भव्य बुद्ध विहार, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 20 लाखांचा निधी मंजूर, भूमिपूजनही संपन्न