व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शरद पवार यांच्या पक्षाला मिळाले नवीन चिन्ह; महाराष्ट्राचा इतिहास आणि संस्कृतीसोबत चिन्हाचे घट्ट नाते । Sharad Pawar Party New Symbol

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' असे नाव यापूर्वीच दिले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 23, 2024
in महाराष्ट्र, देश-विदेश
Sharad-Pawar-Party-New-Symbol

Photo Courtesy : Team Dainik Maval


केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला (Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar) ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ असे नाव यापूर्वीच दिले आहे. हेच नाव पुढील आदेशापर्यंत उपयोगात आणण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच या आदेशावेळी निवडणूक आयोगाने 7 दिवसांच्या आत शरद पवार यांच्या पक्षाला चिन्ह देण्याचेही आदेश दिले होते. त्यानुसार आज (दि. 2) आयोगाने शरद पवार गटाला नवे चिन्ह (Sharad Pawar Party New Symbol) दिले आहे. ‘तुतारीवाला माणूस’ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला दिले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले. या गटात पुढे खरी राष्ट्रवादी कोणाची हा दावा उभा राहिला. यात अजित पवार गट यांचा विजय झाला. आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे नाव आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह मिळाले. मात्र शरद पवार गटाला नवे नाव देण्यात आले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव शरद पवार गटाला देण्यात आले होते. मात्र अद्याप चिन्ह मिळाले नव्हते. परंतू आता ‘तुतारीवाला माणूस’ हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला दिले आहे. निवडणूक आयोगाने तसे पत्र पाठवले आहे. त्यामुळे शरद पवार यांचा पक्ष याच चिन्हावर आणि ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ ह्या नावावर निवडणूक लढवेल. ( Tutarivala Manus Sharad Pawar Party Allotted New Election Symbol By Election Commission )

“एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी!”

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह… pic.twitter.com/LsgvjlWzuN

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) February 22, 2024

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे पुढील निर्देश येईपर्यंत ‘तुतारीवाला माणूस’ हेच शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह असणार आहे. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) हे नाव आणि चिन्ह म्हणून ‘तुतारीवाला माणूस’ यावरच कदाचित शरद पवार गटाला आगामी काही निवडणुका लढवाव्या लागणार आहेत.

अधिक वाचा –
– वडगाव शहरात 112 वाहनांची मोफत वायू प्रदूषण चाचणी आणि पीयूसी प्रमाणपत्र वाटप । Vadgaon Maval
– लोणावळा जवळील लायन्स पॉइंट येथे दरीत कोसळून 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू । Lonavala News
– वळक गावात बांधले जाणार भव्य बुद्ध विहार, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 20 लाखांचा निधी मंजूर, भूमिपूजनही संपन्न


dainik maval jahirat

Previous Post

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी 1792 कोटींचा निधी उपलब्ध

Next Post

मोठी बातमी! निष्ठावंत शिवसैनिक हरपला… महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन । Manohar Joshi Passes Away

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Manohar-Joshi-Passes-Away

मोठी बातमी! निष्ठावंत शिवसैनिक हरपला... महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन । Manohar Joshi Passes Away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

important meeting to expedite pending issues development works related to Water Resources Department in Maval Taluka

मावळ तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न व विकासकामांना गती देणारी महत्वपूर्ण बैठक

August 26, 2026
DCM Eknath Shinde visits Talegaon Dabhade Chakan industrial areas inspects road repairs

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तळेगाव, चाकण औद्योगिक क्षेत्राला भेट; रस्ते दुरुस्तीची केली पाहणी

August 25, 2026
Conduct an immediate audit of government health system in Maval Taluka BJP aggressive stance on health issues

मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक

August 25, 2026
MLA Sunil Shelke holds crucial meeting with administration to accelerate development works in Maval Taluka

मावळच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासनासोबत आमदार सुनील शेळके यांची महत्त्वपूर्ण बैठक

August 25, 2026
Momentum for Lonavala Glass Skywalk path cleared for actual project work as tender draft is finalized

Lonavala : लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती ; निविदा मसुदा अंतिम झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा

August 22, 2026
Muktabai Vinode of vadgaon Maval belonging to older generation has passed away due to old age

वडगाव मावळ येथील जुन्या पिढीतील श्रीमती मुक्ताबाई राधू विनोदे यांचे वृध्दापकाळाने निधन

August 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.