श्री क्षेत्र देहू नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांसाठी 24 कोटी 26 लाख रुपयांचा निधी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाला होता. ह्या निधीतून होणाऱ्या सर्व प्रस्तावित विकास कामांचे भूमिपूजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) करण्यात आले. यावेळी देहूवासियांनी आमदार सुनिल शेळके यांचे जेसीबीतून फुले अंगावर उधळत अत्यंत जल्लोषात स्वागत केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
श्री क्षेत्र देहू म्हणजे संतभूमी आणि या संतभूमीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. शहराचा विस्तार वाढला की पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक असते. याच विकासात्मक दृष्टिकोनातून संपुर्ण शहरातील कॉलनीमधील अंतर्गत रस्ते, जोडणारे मुख्य रस्ते काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले आहेत. तसेच ड्रेनेज लाईन टाकण्याची कामे सुरु आहेत. ( MLA Sunil Shelke performed Bhoomi Pujan for various development works in Dehu Nagar Panchayat )
रविवारी भूमिपूजन झालेल्या 24 कोटी 26 लक्ष निधीतून विविध विकासकामे मार्गी लागतील. स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने देहूतील सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेल्या मुलभुत गरजांना आणि हिताला प्राधान्य देऊन विकासकामे करण्यावर भर आहे. शहरातील प्रत्येक रस्ता सुधारणा करण्याबरोबरच कचरा संकलनासाठी घंटागाडी, नवीन अग्निशमन वाहन इ. कामेही मार्गी लागली आहेत. यापुढील काळात देखील विकास करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील, अशा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी नागरिकांना दिला.
‘देहूतील सर्व लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, नागरिक बंधु-भगिनी आणि जिवाभावाचे सहकारी यांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागताने मी भारावून गेलो आहे. या आपुलकीची उतराई देहु शहराच्या सर्वांगीण विकासाने करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना जगद्गुरु तुकोबारायांचा आशीर्वाद नक्कीच लाभेल, हा विश्वास आहे.’ – आमदार सुनिल शेळके
अधिक वाचा –
– मोठी बातमी! हिंजवडीमधील 25 वर्षीय इंजिनियर तरुणाचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू, फांगणे गावाजवळील घटना । Maval News
– मोठी बातमी! हिंजवडीमधील 25 वर्षीय इंजिनियर तरुणाचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू, फांगणे गावाजवळील घटना । Maval News
– सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईला निघाले, अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ