व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी! हिंजवडीमधील 25 वर्षीय इंजिनियर तरुणाचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू, फांगणे गावाजवळील घटना । Maval News

मावळ तालुक्यातील फांगणे जवळ पवना धरण जलाशयात बुडून एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Hinjewadi-Youth-drowned-in-Pavana-Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील (Maval Taluka) फांगणे गावाजवळ पवना धरण (Pavana Dam) जलाशयात बुडून एका 25 वर्षीय युवकाचा मृत्यू (Youth Died) झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज, रविवार (दि. 25) रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. मयंक अखिलेश उपाध्याय (वय 25) असे सदर मृत तरुणाचे नाव आहे. तो मुळ पानिपत (रा. हरियाणा) येथील रहिवासी असून सध्या हिंजवडी मध्ये एका खासगी कंपनीत काम करत होता. रविवारी मित्रांसमवेत पवना धरण भागात फिरायला आल्यानंतर हा प्रकार घडला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक हा त्याच्या इतर चार पाच मित्रांसमवेत पवना धरण भागात फिरायला आला होता. त्यावेळी पवना धरणाच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी 5 मित्रमैत्रिणी पाण्यात उतरले. तेव्हा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने इंजिनिअर असलेल्या मयंक अखिलेश उपाध्याय याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ( 25 year old engineer youth from hinjewadi drowned in pavana dam )

मयंक पाण्यात गटांगळ्या खात असताना त्याच्या सोबतच्या मित्रमैत्रिणींनी आरडोओरडा केल्याने आजूबाजूचे गावकरी गोळा झाले, त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांना यश आले नाही. अखेर 1.30 वाजता त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. एव्हाना लोणावळा ग्रामीणचे पोलिस अधिकारी विजय गाले, जय पवार हेही घटनास्थळी दाखल झाले होते. सध्या मयंकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खंडाळा येथे नेण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.

अधिक वाचा –
– स्तुत्य उपक्रम! रोटरी क्लबच्या माध्यमातून दोन शाळांमध्ये बांधले जाणार अत्याधुनिक स्वच्छतागृह, भूमिपूजन संपन्न । Talegaon Dabhade
– महाराष्ट्रातील ‘या’ सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनिर्वाचित 6 खासदारांची नावे । Rajya Sabha Election 2024
– वडगावमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक; ‘मावळात दीड लाखाच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू’ – आमदार सुनिल शेळके


dainik maval jahirat

Previous Post

सर्वात मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत मनोज जरांगे थेट मुंबईला निघाले, अंतरवाली सराटीत मोठा गोंधळ

Next Post

खासदार श्रीरंग बारणेंचे टेन्शन वाढले; राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपचाही मावळ लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचा निर्धार! Maval Lok Sabha 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Lok-Sabha-Election-2024

खासदार श्रीरंग बारणेंचे टेन्शन वाढले; राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपचाही मावळ लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचा निर्धार! Maval Lok Sabha 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.