व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक; ‘मावळात दीड लाखाच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू’ – आमदार सुनिल शेळके

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 'आढावा बैठक' आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बापूसाहेब भेगडे यांचा 'सत्कार समारंभ' वडगाव मावळ येथे संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 25, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
maval-loksabha-ncp-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‘आढावा बैठक’ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बापूसाहेब भेगडे यांचा ‘सत्कार समारंभ’ वडगाव मावळ येथे संपन्न झाला. या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी मार्गदर्शन केले. आमदार सुनिल शेळके यांसह पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, इतर जेष्ठ मान्यवर, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, युवा सहकारी व महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

“पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा समाजातील प्रत्येक घटकाचा पक्ष आहे. त्या सर्व समाज घटकापर्यंत पोहोचणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आदरणीय अजितदादांनी आपल्या मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरपुर निधी दिला आहे. त्यातील अनेक कामे पुर्ण झाली आहेत, तर काही कामे पूर्णत्वास येत आहेत. मावळच्या जनतेचे हित लक्षात घेऊनच ग्लास स्कायवॉक सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येत आहे. माननीय अजितदादांचे आणि पक्षाचे कार्य व्यापक स्वरुपात मांडण्यासाठी बुथ निहाय काम करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे बूथ कमिट्या सक्षम करण्यावर विशेष लक्ष देण्यात यावे. त्यामुळे आपल्या पक्षाचा पदाधिकारी प्रत्येक घरापर्यंत जोडण्यास मदत होईल,” असे मत आमदार सुनिल शेळके यांनी मनोगतादरम्यान व्यक्त केले. (MLA Sunil Shelke expressed his belief that NCP MP will be elected in Maval Lok Sabha constituency)

मावळ लोकसभेसाठी राष्ट्रवादी सज्ज?
दरम्यान या आढावा बैठकीत मावळ लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने कंबर कसल्याचे दिसून आले. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून आढावा बैठका घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वडगावात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आढावा बैठक झाली, यातून निवडणूकीची तयारी करण्यात येत असल्याचे दिसते. मावळ लोकसभेबाबत आमदार सुनिल शेळके यांनी स्पष्ट शब्दात भुमिका मांडली. ‘मी ठामपणे सांगतो आतापर्यंत राष्ट्रवादीचा खासदार मावळात झालाच नाही. जर मावळला राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची तिकीट दिली तर दीड लाखाच्या मताधिक्याने निवडून आणू,’ असा ठाम विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा –
– मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मासिक सभा संपन्न; संघटनेला बळकट करण्यासाठी हंगामी कार्यकारिणी जाहीर, वाचा अधिक
– मावळवासियांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त 56 टक्के जलसाठा, भविष्यातील ‘पाणीबाणी’ टाळण्यासाठी ‘ही’ गोष्ट नक्की करा । Pavana Dam
– लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला ‘दुर्ग रत्न’ पुरस्कार, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय अन् आदर्शवत कार्यासाठी शिवदुर्गचा गौरव । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

‘पोक्सो’ कायदा आणि ‘निर्भया’ योजनेबद्दल कान्हे शाळेतील विद्यार्थ्यांना वडगाव मावळ येथील पोलिस अधिकाऱ्यांकडून सखोल मार्गदर्शन

Next Post

महाराष्ट्रातील ‘या’ सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनिर्वाचित 6 खासदारांची नावे । Rajya Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
India-New-Parliament-Building

महाराष्ट्रातील 'या' सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनिर्वाचित 6 खासदारांची नावे । Rajya Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.