व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळवासियांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त 56 टक्के जलसाठा, भविष्यातील ‘पाणीबाणी’ टाळण्यासाठी ‘ही’ गोष्ट नक्की करा । Pavana Dam

पवन मावळ विभागातील नागरिक, सामान्य शेतकरी यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या पवना धरणातील जलसाठा घटू लागला आहे. पवना धरणात आजमितीस 167.93 दलघमी इतका पाणीसाठा आहे. Only 56 percent water in Pavana Dam Citizens of Pimpri Chinchwad and Maval Need To Use Water Sparingly.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल
Pavana-Dam-Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ विभागातील नागरिक, सामान्य शेतकरी यांच्यासाठी महत्वाच्या असलेल्या पवना धरणातील जलसाठा घटू लागला आहे. पवना धरणात आजमितीस 167.93 दलघमी इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे या भागातील मावळवासियांसाठी हा सावधानतेचा इशारा आहे. नागरिकांनी आता पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे. पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांसाठी तर ही बाब भविष्याच्यादृष्टीने अत्यंत चिंतेची आहे. याचे कारण ही दोन्ही महानगरे पवना धरणातील जलाशयावर अवलंबून आहेत. त्यामुळे आजपासूनच खरं तर पिंपरी-चिंचवडकरांनी पाण्याबाबत काटकसर करणे गरजेचे आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पाण्याची काटकसर आवश्यक –
मावळ तालुक्यातील पवना धरणात सद्यस्थितीला 56.75 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या फेब्रुवारी महिन्याचा अखेरचा हफ्ता सुरु आहे. सध्या असलेला 56.75 टक्के पाणीसाठा बाष्पिभवन आणि अन्य कारणे गृहित धरल्यास जूनपर्यंत पुरु शकतो, असे सांगितले जात आहे. परंतू उन्हाची तीव्रता किती असणार, धरणातून होणारी गळती, पाण्याचा ‘पाठीमागच्या दाराने’ होणारा बेसुमार वापर अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे हा जलसाठा कदाचीत लवकरही संपू शकतो. त्यामुळे सर्वांनीच याबाबत सावध होत पाण्याबाबत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. ( Only 56 percent water in Pavana Dam Citizens of Pimpri Chinchwad and Maval Need To Use Water Sparingly )

पिंपरी चिंचवडकरांना सध्या दिवसाआड पाणीपुरवठा –
पुढील वर्षापर्यंत म्हणजेच 2025 पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते. परंतू उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढते, तेव्हा नागरिकांच्या तक्रारीही वाढतील, अशावेळी हा निर्णय कसा वास्तवात कायम राहिल, हे पाहावे लागेल. सद्यस्थिती महापालिका प्रशासनाने 25 नोव्हेंबर 2019 पासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केलाय आणि तेव्हापासूनच हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

महापालिकेला आंद्रा आणि भामा आसखेडचा पर्याय –
पिंपरी चिंचवड महापालिका आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून 267 एमएलडी पाणी शहरासाठी आणणार आहे. त्या पाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने चिखलीत 8 हेक्टर परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. आंद्रा धरणातून निघोजे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलून समाविष्ट भागातील नागरिकांना देण्यात येत आहे, हेही सध्याचे एक आश्वासक चित्र आहे. मात्र भामा आसखेड आणि आंद्रा धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या अगोदरच जास्त आहे, हेही नजरेआड करून चालणार नाही. एकूणच नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्रशासनाने पाण्याबाबत योग्य निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात ‘पाणीबाणी’ होऊ शकते, हे सत्य नाकारता येणार नाही.

पवना धरणातील सध्याचा पाणीसाठा (आकडेवारी) –
धरणातील एकूण पाणीसाठा – 167.93 दलघमी अर्थात 56.75 टक्के
धरणातील उपयुक्त पाणीसाठा – 136.79 दलघमी
पवना धरणातील मृत जलसाठा – 31.14 दलघमी

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील जलरथाला हिरवा झेंडा; विविध योजनांची माहिती देण्यासाठी 13 तालुक्यातील 1 हजार 843 गावांतून फिरणार चित्ररथ
– डॉ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर । Talegaon Dabhade
– पिंपरी-चिंचवडला आता मुळशी धरणातून पाणी; शहरासाठी 10 टीएमसी कोटा राखीव ठेवण्यास मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला ‘दुर्ग रत्न’ पुरस्कार, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय अन् आदर्शवत कार्यासाठी शिवदुर्गचा गौरव । Lonavala News

Next Post

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मासिक सभा संपन्न; संघटनेला बळकट करण्यासाठी हंगामी कार्यकारिणी जाहीर, वाचा अधिक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Taluka-Teachers-Association

मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाची मासिक सभा संपन्न; संघटनेला बळकट करण्यासाठी हंगामी कार्यकारिणी जाहीर, वाचा अधिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.