व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘पोक्सो’ कायदा आणि ‘निर्भया’ योजनेबद्दल कान्हे शाळेतील विद्यार्थ्यांना वडगाव मावळ येथील पोलिस अधिकाऱ्यांकडून सखोल मार्गदर्शन

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथे विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा (POCSO Law) आणि निर्भया योजना (Nirbhaya Yojana) संबंधी मार्गदर्शन करण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 24, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Kanhe-School-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथे विद्यार्थ्यांना पोक्सो कायदा (POCSO Law) आणि निर्भया योजना (Nirbhaya Yojana) संबंधी मार्गदर्शन करण्यात आले. शुक्रवारी (दिनांक 23 फेब्रुवारी) रोजी कान्हे शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या पीएसआय मोहिते मॅडम, पोलिस अधिकारी गायकवाड मॅडम आणि पोलिस अधिकारी तावरे सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वडगाव मावळच्या पोलिस उपनिरिक्षक मोहिते मॅडम यांनी कान्हे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बाल अत्याचार विरोधी कायदा (Protection of Children from Sexual Offences Act) अर्थात पोक्सो (Pocso) बद्दल मार्गदर्शन केले. तसेच शालेय विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’ यांतील फरक समजावून सांगितला. यासह शाळेतील मुलींना मुलींसाठी असणारी ‘निर्भया’ योजना नेमकी काय आहे, याचीही माहिती दिली. ( Vadgaon Maval Police Guidance to students about POCSO Act and Nirbhaya Yojana at Kanhe School )

  • ‘सर्व शालेय विद्यार्थ्यांनी अन्यायाविरोधात नेहमीच आवाज उठवून अत्याचारी व्यक्तीला वेळीच प्रतिबंध केला पाहिजे. त्यासाठी आपले पालक, शिक्षक यांच्याशी न घाबरता अशा गोष्टींबाबत चर्चा केली पाहिजे,’ असे मार्गदर्शन विद्यार्थीनींना करण्यात आले. तर, ‘आपल्या सोबत शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली ह्या आपल्या बहिणी आहेत. त्यांच्याशी आदराने आणि सामंजस्याने वागणे-बोलणे ही आपली जबाबदारी आहे,’ असे सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगण्यात आले. तसेच तुमच्या अवतीभोवती तुम्हाला कोणीही त्रास देत असेल तर तत्काळ आमच्याशी संपर्क साधा, असे आवाहनही विद्यार्थ्यांना करण्यात आले.

पोलिस अधिकारी तावरे साहेब यांनी सर्व मुलांना, “गुन्हा” कशाला म्हणतात आणि आपली वर्तणूक कशी असावी, याबद्दल मार्गदर्शन केले. समाजातील अन्याय, अत्याचार आणि बालगुन्हेगारी याविषयी माहिती दिली. तसेच पोलीस आपले मित्र आहेत, हेही समजावून सांगितले. यासह शाळेत एक तक्रार पेटी उपलब्ध करून ज्यांना काही अडीअडचणी असतील त्यांनी पेटीत तक्रार लिहून टाकावी. शाळेने अशा तक्रारीची दखल घेऊन मुला मुलींच्या समस्यांबाबत जागरूक राहून पोलीस स्टेशनशी संपर्क ठेवावा, अशा सुचना शालेय व्यवस्थापनाला करण्यात आल्या.

ह्या कार्यक्रमाचे संयोजन कान्हे शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्या आरती भाळवणे आणि स्वप्नाली आरोटे यांनी केले होते. यावेळी मोहिते मॅडम यांचे स्वागत आणि सत्कार कान्हे शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला ढोरे आणि आरती भाळवणे यांनी केले. तर, सहाय्यक पोलीस अधिकारी गायकवाड मॅडम यांचे स्वागत आणि सत्कार ज्येष्ठ शिक्षिका सविता क्षीरसागर आणि जिजाराम काळडोके सरांनी केले. तसेच पोलीस कर्मचारी तावरे साहेबांचे स्वागत आणि सत्कार स्वप्नाली आरोटे आणि अनिता ढगे मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब खरात यांनी केले. सर्वांचे आभार जिजाराम काळडोके यांनी मानले. सदर कार्यक्रमांला सर्व शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. सर्व मुला मुलींनी ‘पोलीस मित्र’ ही संकल्पना खूप छान असल्याची आणि मनातील भीती दूर करून निर्भय होण्यासाठी उपयुक्त असल्याची समाधानी प्रतिक्रिया व्यक्त केली.

अधिक वाचा –
– मावळवासियांनो, पाणी जपून वापरा! पवना धरणात फक्त 56 टक्के जलसाठा, भविष्यातील ‘पाणीबाणी’ टाळण्यासाठी ‘ही’ गोष्ट नक्की करा । Pavana Dam
– लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला ‘दुर्ग रत्न’ पुरस्कार, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय अन् आदर्शवत कार्यासाठी शिवदुर्गचा गौरव । Lonavala News
– अत्यंत महत्वाचे! पुणे-सोलापूर, पुणे- सातारा, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग हद्दीतील अनधिकृत व्यवसाय काढून घेण्याचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

मनोज जरांगेंच्या आवाहनाला मावळ तालुक्यात मराठा समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद; आंदोलकांनी थेट जुना मुंबई-पुणे महामार्ग रोखला । Maratha Samaj Rasta Roko Andolan

Next Post

वडगावमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक; ‘मावळात दीड लाखाच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू’ – आमदार सुनिल शेळके

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval-loksabha-ncp-sunil-shelke

वडगावमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक; 'मावळात दीड लाखाच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू' - आमदार सुनिल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.