व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 25, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान : अंतिम निकाल जाहीर, शासकीय गटात साखरा शाळा प्रथम, खाजगी गटात एस्पेलियर हेरिटेज स्कूलची बाजी

पारितोषिक प्राप्त शाळांना येत्या 5 मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 4, 2024
in महाराष्ट्र
Mazi-Shala-Sundar-Shala

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्यातील शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक शासकीय शाळा गटात वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा साखरा आणि खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव धागा) शाळेने पटकावले आहे. शासकीय गटात द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेदवली (ता. कर्जत जि. रायगड), तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा ढालेवाडी (ता. कवठेमहांकाळ जि. सांगली.) यांनी मिळविला तर खाजगी शाळा गटात शारदाबाई पवार विद्यानिकेतन, शारदानगर (ता. बारामती जि. पुणे) द्वितीय आणि भोंडवे पाटील शाळा बजाजनगर (ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) शाळेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत या पारितोषिक विजेत्या शाळांची माहिती दिली. पारितोषिक प्राप्त शाळांना येत्या 5 मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

nakshtra ads may 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमांत 1 लाख 3 हजार 312 शाळा सहभागी झाल्या. यामध्ये 64 हजार 312 शासकीय शाळा आणि 39 हजार खाजगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमधील 1 कोटी 99 लाख 61 हजार 586 विद्यार्थी सहभागी झाले. यामध्ये 1 कोटी 4 लाख 64 हजार 420 विद्यार्थी व 94 लाख 97 हजार 166 मुलींचा सहभाग होता. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

tata tiago ads may 2025

अभियानात बक्षिसांची रक्कम 66 कोटीवर –
राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेस 51 लाख, द्वितीय क्रमांक 21 लाख आणि तृतीय क्रमांकाच्या शाळेस 11 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या अभियानात राज्यस्तरावर-1, बृहन्मुंबई मनपा-1, अ व ब वर्ग मनपा-1, विभागस्तरीय-8, जिल्हास्तरीय-36, तालुकास्तरीय-358 अशी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे देण्यात येणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका व ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातील शाळांना पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख व तिसरे पारितोषिक 7 लाख रूपयांचे असेल. 8 विभागीय स्तरावर पहिले 21 लाख, दुसरे 11 लाख, तिसरे 7 लाख रूपयांचे, जिल्हास्तरावर पहिले 11 लाख, दुसरे 5 लाख, तिसरे 3 लाख रुपये तर तालुकास्तरावर पहिले 3 लाख, दुसरे 2 लाख, तिसरे 1 लाख रुपये, अशी 66 कोटी 10 लाखाची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रम नियमितपणे राबविणार –
विद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकसित होण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येईल, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. ते म्हणाले, शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेऊन ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम राज्यात प्रथमच राबविण्यात आला. या उपक्रमातून शाळांच्या बाह्य घटकांसोबत व आंतर घटकांवर देखील प्रभावी काम करण्यात आले. या उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला यातून या उपक्रमाचे महत्व अधोरेखित होते शाळा व विद्यार्थ्यांना या उपक्रमातून प्रेरणा मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र लिहून प्रोत्साहित केले हेही या उपक्रमाचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.

वाचन सवय प्रतिज्ञा मध्ये 18 लाख विद्यार्थ्यांचा सहभाग : गिनीज बुक ने घेतली दखल
वाचन चळवळीमध्ये 18 लाख विद्यार्थ्यांनी वाचन सवय प्रतिज्ञा मध्ये सहभाग घेतला असून शिक्षण विषयक हस्तलिखित स्पर्धेत 13 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून एका दिवसात हस्ताक्षरातील अभिप्रायांचा फोटो संकेत स्थळावर अपलोड केला आहे. याची दखल गिनीज बुक मार्फत घेण्यात आली असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान पेपरलेस पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात आल्याचे सांगून मंत्री केसरकर म्हणाले, वीज बचत, आर्थिक साक्षरता, डिजिटल उपक्ररणाचा वापर, लोकशाही संसदीय मूल्यांचा वापर, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसन याकडे अभियानात विशेष लक्ष देण्यात आले. ( Mazi Shala Sundar Shala Campaign Final Result Announced Minister Deepak Kesarkar Press Conference )

अधिक वाचा –
– शिळींब येथे आदिवासी कातकरी कुटुंबाची झोपडी जळून खाक; गरीब आदिवासी बांधवांना मदतीची प्रतिक्षा । Maval News
– दैनिक मावळ संवाद : पत्नीसोबत मोमोज खात असताना आयडीया सुचली आणि तिथूनच सुरु झाला नवा प्रवास… । Content Creator & Blogger Manoj Shinguste
– ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकासनिधी वाढवून 5 कोटी केल्याबद्दल वारकरी बांधवांनी मानले अजित पवारांचे आभार! 479 देवस्थानांना होणार लाभ


dainik maval ads may 2025

Previous Post

मावळ दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदे यांची जबरदस्त खेळी, खासदार बारणेंना होणार फायदा । Maval Lok Sabha

Next Post

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रस्ता आणि ओपन जिमचे भूमिपूजन संपन्न । Pimpri Chinchwad

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shrirang-barne-pimpri-chinchwad

खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रस्ता आणि ओपन जिमचे भूमिपूजन संपन्न । Pimpri Chinchwad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Fatal accident on Mumbai-Pune Expressway Seven vehicles collide Two women killed five injured

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात ! अनियंत्रित ट्रेलरसह सात वाहनांचा अपघात ; दोन महिला ठार, पाचजण जखमी । Accident On Mumbai Pune Expressway

May 24, 2025
Verification-of-Birth-Records

जन्म नोंदणी प्रमाणपत्र देताना प्रमाणित कार्य पद्धतीचा (एसओपी ) अवलंब करावा

May 24, 2025
Minister Aditi Tatkare

महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्यात ‘आदिशक्ती अभियान’ ; प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा घेऊन कार्यवाही करणार

May 24, 2025
Chhagan Bhujbal

आधी मंत्रिमंडळात कमबॅक, त्यानंतर ‘या’ वजनदार खात्याचा कार्यभार – पाहा छगन भुजबळांना कोणते खाते मिळाले

May 24, 2025
ECI Central Election Commission

चांगला निर्णय : मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग

May 24, 2025
Shepherds who went to Konkan begin their journey back home

मेंढपाळ बाबा निघाले घरला… कोकणात उतरलेल्या मेंढपाळांचा परतीचा प्रवास सुरू

May 24, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.