लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकरल्यापासूनच अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आदींकरिता अपर जिल्हा दंडाधिकारी पुणे यांनी दिनांक 06 मार्च रोजी सीआरपीसी कलम 144 अन्वये प्रतिबंध आदेश जारी केले होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
तसेच सत्यसाई कार्तिक यांनीही सर्व आस्थापना चालकांना सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती कार्तिक यांना प्राप्त झाली होती. त्याची खातरजमा करण्यासाठी सत्यसाई कार्तिक यांनी शुक्रवारी (दि. 8 मार्च) रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीचे ठिकाण पाठवले, तेव्हा कामशेत आणि वडगाव मावळ येथे दोन्ही ठिकाणी पथकाने छापे टाकले. त्यामध्ये दोन्ही ठिकाणी एकूण 2 बार रेस्टॉरंट त्यांचे ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई. विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी विक्री करताना दिसून आले. तसेच सदर बारमध्ये ऑर्केस्ट्रा-संगीत हे विहित कालमर्यादेपेक्षा अधिक वेळेसाठी सुरू असल्याचे आढळून आले.
त्यामुळे दोन्ही ठिकाणच्या बार मालकांवर भा.द.वि. कलम 188 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33 (डब्ल्यू) अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे अनुक्रमे कामशेत पोलीस स्टेशन आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस करत आहेत. तसेच अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढे देखील सुरूच राहणार असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोलिस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलिस नाईक दत्ता शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल राहीस मुलानी यांच्या पथकाने केली आहे. ( IPS Satya Sai Karthik Team Raid on 2 Orchestra Bar at Kamshet and Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशातील महिलांना मोठे गिफ्ट! जागतिक महिला दिनानिमित्त घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात
– वडगाव येथे मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा कार्यकारिणी नियुक्तीपत्रे वाटप आणि संवाद मेळावा संपन्न । Maval NCP
– महाशिवरात्रीच्या दिवशीच घरातील देव्हाऱ्याजवळ नागाचे दर्शन, वन्यजीव रक्षकच्या सर्पमित्रांमुळे अनर्थ टळला – पाहा व्हिडिओ