मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस (अजित पवार गट) नूतन कार्यकारिणीचा नियुक्तीपत्र वाटप मेळावा वडगाव मावळ येथे गुरुवारी (दि. 7 मार्च) संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार सुनिल शेळके यांसह राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, सर्व विभाग अध्यक्षा, शहराध्यक्षा आणि पदाधिकारी महिला-भगिनी उपस्थित होत्या. ह्यावेळी शिळींब गावच्या अध्यक्षपदी नेहा दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
पक्ष वाढीसाठी काम करणार – नेहा दरेकर
‘शिळींब गाव हे पूर्वीपासूनच अजितदादा यांच्या पाठीशी आहे. आताही अजितदादा पवार यांच्या विचार आणि धोरणांना सर्वांपर्यंत घेऊन जाणार आणि त्यातून पक्ष वाढीसाठी कार्य करणार. गावातील महिलांना पक्षाच्या माध्यमातून पुढे आणून त्यांच्या विकासासाठी कार्यरत राहणार’ असे नेहा दरेकर यांनी दैनिक मावळशी बोलताना सांगितले. ( Neha Darekar appointed as Shilimb village president of Maval taluka NCP Mahila Congress )
अधिक वाचा –
– महत्वाचे! राज्यात पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी 3 एप्रिल रोजी होणार, वाचा सविस्तर
– ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन, ‘इथे’ करा संपर्क
– ‘मी त्या वाटेने जात नाही आणि गेलो तर सोडत नाही’, शरद पवारांचा आमदार सुनिल शेळकेंना इशारा, काय म्हणाले पवार? वाचा सविस्तर । Sharad Pawar criticizes MLA Sunil Shelke