व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विमानाला लागणाऱ्या इंधनाचा काळा बाजार, सोमाटणे येथे पोलिसांची धडक कारवाई, 5 जण रंगेहात ताब्यात । Pune Crime

मुंबई येथून पुणे विमानतळावर विमानाचे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर मधून इंधन चोरणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 9, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
somatne-Pune-Crime

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुंबई येथून पुणे विमानतळावर विमानाचे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर मधून इंधन चोरणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सोमाटणे टोलनाका जवळ असलेल्या एका हॉटेलच्या परिसरात हा काळा बाजार सुरु असताना पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना रंगेहाथ पकडले आहे. बुधवारी (दि. 6 मार्च) ही कारवाई करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मंगेश सखाराम दाभाडे (वय 42, रा. तळेगाव दाभाडे), इलाही सैफन फरास (वय 45, रा. धानोरी, पुणे), अनिल सतईराम जस्वाल (वय 28, रा. उत्तर प्रदेश), अमोल बाळासाहेब गराडे (वय 31, रा. पिंपळखुटे, ता. मावळ), परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड (वय 36, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ( Black market of aircraft fuel police raid in Somatne 5 people arrested Pune Crime )

पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे टोल नाक्याजवळ शांताई हॉटेलच्या परिसरात विमानाला लागणारे इंधन (एटीएफ/जेट इंधन) टॅंकर मधून काढून त्याची विक्री करण्याचा काळा बाजार सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. जागा मालक मंगेश दाभाडे याने टॅंकर चालक ईलाही आणि अनिल या दोघांशी संगनमत करून अमोल आणि परशुराम याच्या मदतीने टॅंकर मधून जेट इंधन काढून घेत असताना त्यांना पोलिसांनी पकडले.

आरोपींकडून 1540 लिटर एटीएफ/जेट इंधन, रिकामे प्लास्टिक कॅन, लोखंडी टॉमी, इंधन मोजण्यासाठी लागणारी लोखंडी पट्टी असा एकूण एक लाख 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मंगेश दाभाडे याच्यावर सन 2008, सन 2016 आणि सन 2019 मध्ये दारूबंदी कायद्यान्वये चार तसेच सन 2022 मध्ये मारहाण केल्याचा एक असे पाच गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक धनराज किरनाळे, सहायक फौजदार नारायण जाधव, संजय गवारे, प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, वासुदेव मुंडे, प्रशांत सैद, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.

अधिक वाचा –
– महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज आणि जाखमाता देवी या भाऊ-बहिणीची भेट; ग्रामस्थांनी जपली 100 वर्षांपासूनची परंपरा । Vadgaon Maval
– महत्वाचे! राज्यात पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी 3 एप्रिल रोजी होणार, वाचा सविस्तर
– ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन, ‘इथे’ करा संपर्क


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शिळींब गावच्या अध्यक्षपदी नेहा दरेकर यांची नियुक्ती । Maval News

Next Post

कामशेत येथील पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे प्रवासादरम्यान निधन । Journalist Chandrakant Lole passed away

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Journalist-Death

कामशेत येथील पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे प्रवासादरम्यान निधन । Journalist Chandrakant Lole passed away

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala residents public outcry against Tata highway blocked demanding compensation for flood damages

टाटा कंपनीविरोधात लोणावळाकरांचा जनआक्रोश, महामार्ग रोखला ; पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी आंदोलन

July 29, 2026
Laptops distributed to Assistant Agriculture Officers by Deputy Chief Minister Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉपचे वाटप; मावळमधील ४५ अधिकाऱ्यांना लॅपटॉप

July 29, 2026
Car overturns into field after road collapses at Kale-Pavananagar no remedial measures taken after accident

काले-पवनानगर येथे रस्ता खचल्याने कार शेतात उलटली, सुदैवाने जिवितहानी टळली; अपघाताच्या चार दिवसांनंतरही उपाययोजना शून्य

July 28, 2026
Rice-Cultivated-Maval

Rice Farming in Maval Taluka : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं

July 28, 2026
SRT

SRT Rice Technique : ‘एसआरटी’ म्हणजे नक्की काय रे भाऊ ? भात लागवडीची ही पद्धत का होतेय शेतकऱ्यांच्या पसंतीची, जाणून घ्या

July 28, 2026
Momentum for Nigdi-Chakan Metro Line Project Plan Presented mp shrirang barne mla sunil shelke

किवळे- रावेत- डांगे चौक- काळेवाडी- जगताप डेअरी ते चतु:श्रृंगी मेट्रो मार्गाचा ‘डीपीआर’ तयार करण्याची सूचना

July 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.