कामशेत (Kamshet) येथील पत्रकार चंद्रकांत लोळे (वय 42) यांचे शुक्रवारी (दि. 8 मार्च) निधन झाले. धुळे (Dhule) येथून मित्राला भेटून परतीच्या मार्गावर असताना नाशिक (Nashik) येथे त्यांचे निधन झाले. लोळे यांच्या निधनाने मावळ तालुक्यातील (Maval Taluka) पत्रकार कुटुंबात शोक पसरला आहे. चंद्रकांत लोळे (Chandrakant Lole) हे पत्रकारितेसह कामशेत शहरातील प्रसिद्ध लॉन्ड्री व्यावसायिक म्हणून देखील परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, दोन भाऊ, भावजयी असा मोठा परिवार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
चंद्रकांत लोळे यांनी लोकमत (Lokmat) दैनिकात कामशेत भागाचे पत्रकार म्हणून अनेक वर्ष काम केले. तसेच लोणावळा टाइम्स हे न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनल त्यांनी सुरू केला होता. त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण झालेले होते. पत्रकार म्हणून काम करत असताना कामशेत परिसरातील विविध विषयांवर त्यांनी लेखन केले होते, तसेच अनेक प्रश्नांना वाचा फोडली होती. ( Kamshet Maval journalist Chandrakant Lole passed away )
अधिक वाचा –
– विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा युवा सेनेच्या वतीने सन्मान । Pimpri Chinchwad
– महाशिवरात्री निमित्त पोटोबा महाराज आणि जाखमाता देवी या भाऊ-बहिणीची भेट; ग्रामस्थांनी जपली 100 वर्षांपासूनची परंपरा । Vadgaon Maval
– महत्वाचे! राज्यात पाचवी आणि आठवीची वार्षिक परीक्षा व नियतकालिक मूल्यांकन चाचणी 3 एप्रिल रोजी होणार, वाचा सविस्तर