लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा करीत मावळ तालुक्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी आणला आहे. ग्रामीण भागासह तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत, देहू नगरपंचायत येथील कामांसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. समाज माध्यमातून निधी उपलब्ध झालेली कामे प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
नागरिकांकडून होत असलेल्या मागणीनुसार ग्रामीण भागातील मुख्य रस्ते तसेच वाडी वस्तीला जोडणारे अंतर्गत रस्ते, साकव पूल,स्मशानभूमी, निवारा शेड, सभा मंडप बांधणे अशी कामे होणार आहेत. तर शहरी भागात रस्ते डांबरीकरण, काँक्रिटीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, समाज मंदिर बांधणे, स्ट्रीट लाईट बसविणे, सभामंडप बांधणे, अधिक क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविणे, बंधारे बांधणे, आरसीसी पाईप टाकणे इत्यादी सर्वसमावेशक कामांसाठी आमदार सुनिल शेळके यांनी निधी आणल्याचे दिसून येत आहे. ( MLA Sunil Shelke has approved funds for Maval Taluka before Implementation of Lok Sabha Election Code of Conduct )
अधिक वाचा –
– तिकोना पेठ येथे विहिरीत पडलेल्या विषारी सापाला जीवदान, सर्पमित्राने विहिरीत उतरुन पकडला साप, धाडसाचे होतंय कौतूक
– खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मावळ तालुक्यातील अनेक गावांना विकास निधी । Maval MP Shrirang Barne
– लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर होणार! किती टप्पे? कधी मतदान? कधी मतमोजणी? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार । Lok Sabha Elections 2024