लोकसभा निवडणूकांची घोषणा होऊन चार दिवस उलटले आहेत. अशात राज्यात मात्र महायुतीच्या जागावाटपाचा तिढा काही सुटताना दिसत नाहीये. महायुतीतील सत्तेत असणार भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही प्रमुख पक्षात जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरुच आहे. परंतू त्यासोबतच महायुतीचे आणि एनडीएचे घटकपक्ष असलेले अन्य पक्षही जागांची मागणी करत आहेत, त्यामुळे लोकसभा जागावाटपाचा महायुतीतील तिढा सुटण्याऐवजी वाढताना दिसत आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
महायुतीतील घटक पक्ष असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षानेही आता जागा वाटपाच्या रणात उडी घेतली आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आरपीआय आक्रमक झालेला दिसत आहे. शिर्डी मतदारसंघ स्वतःसाठी तर लोकसभा मतदारसंघ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासाठी महायुतीने सोडावा, अशी मागणी आरपीआयचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपाकडे केल्याची माहिती समोर येत आहे. परंतू भाजपाने याबाबत कडक भुमिका स्विकारून ह्या जागा न मिळतील, अशी भुमिका घेतल्याचेही बोलले जात आहे. ( Demand To Give Shirdi Lok Sabha Constituency to RPI Party Ramdas Athawale BJP Devendra Fadnavis )
वर्ष 2009 साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांना पराभावाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भाजपा शिर्डी लोकसभेची ही जागा आरपीआयला देऊन पराभावाचा धोका पत्करणार नाही, अशी चर्चा आहे. दरम्यान रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघ सोडला नाही तर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू, असा इशारा पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे यांनी दिला आहे.
अधिक वाचा –
– वडगाव शहरात IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाचा छापा, अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, 3 जणांविरोधात गुन्हा । Maval Crime
– मळवली ते कामशेत स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पुणे-मुंबई रेल्वे सेवा विस्कळीत । Pune Mumbai Railway
– वडगाव मावळ शिवजयंती उत्सव समितीची नवी कार्यकारिणी जाहीर, शिवजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचा निर्णय । Vadgaon Maval