लोणावळा (Lonavala) उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक ( IPS Satyasai Karthik ) यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यापासून विभागातील अवैध धंद्यांवर आणी गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वडगाव मावळ ( Vadgaon Maval) पोलिस (Police) स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्रीकरिता साठवणूक करण्यात आली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी सोमवारी (दिनांक 18 मार्च) रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवले. तेव्हा पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वडगाव शहरातीस एका भाडे तत्वावरील पत्र्याच्या शेडमध्ये मोहम्मद आरिफ मोहम्मद युसुफ सिद्धीकी (वय 25 वर्ष) आणि अन्य एक विधिसंघर्षग्रस्त बालक हे त्यांच्या ताब्यात महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकारचा एकूण सुमारे 2 लाख 52 हजार एवढ्या किमतींचा गुटखा बाळगताना मिळून आले. ( IPS Satyasai Karthik Team Raided at Vadgaon Maval Confiscated Gutkha Worth 2.5 Lakhs Pune Crime )
आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत सदरचा माल हा सलमान लियाकत हुसेन सिद्दिकी (वय अंदाजे 30 वर्ष) (सध्या फरार) याच्या मालकीचा असल्याची माहिती प्राप्त झाली. सदरचा मुद्देमाल जप्त करून वर नमूद तिन्ही आरोपींविरोधात वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम 328 सह अन्न सुरक्षा अधिनियम 2006 चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नितेश (बंटी) कवडे, पोलिस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे, पो.कॉ गणेश येळवंडे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांचा रूट मार्च । Kamshet Police Route March
– मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी
– वडगाव-कातवीमधील 250 एकर औद्योगिक क्षेत्र संपादनमुक्त, स्थानिकांना मोठा दिलासा; आमदार सुनिल शेळकेंची माहिती