लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. तसेच सत्यसाई कार्तिक यांनी लोणावळा विभागातील सर्व आस्थापना चालक यांनी त्यांना नेमून दिलेल्या नियमांचे आणि आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहनही केले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आल्याने कार्तिक यांच्या पथकाने कारवाई सुरु केली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत एका हॉटेलमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर चालत असल्याची खात्रीशीर माहिती सत्यसाई कार्तिक यांना मिळाली होती. त्याआधारे दिनांक 16 मार्च 2024 रोजी मध्यरात्री सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह त्या हॉटेलवर कारवाई केली. तेव्हा हॉटेलचालक सदरचे हॉटेलमधेच अवैध हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना अवैधपणे हुक्का पिण्यासाठी देत असल्याचे मिळून आले. त्यामुळे त्याठिकाणी विक्रीसाठी असलेला हुकक्यासाठी लागणारे सर्व मुद्देमाल एकूण 44 हजार 790 रुपये जप्त करण्यात आला. ( police crackdown on illegal hookah parlors in lonavala case registered against 3 persons )
पोलिस नाईक सचिन गायकवाड यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे 3 जणांविरोधात सिगारेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वित्तरण, विनीमय) अधिनियम 2003 चे सुधारित अधिनियम 2018 चे कलम 4 (अ) व 21 (अ) सह भादवि कलम 188, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, पोसई शुभम चव्हाण, पोसई रोहन पाटील, पोलिस हवालदार अंकुश नायकुडे, पो.ना. सचिन गायकवाड, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ अंकुश पवार, पो.कॉ गणेश येळवंडे, पो.कॉ काळे, पो.कॉ टकले, पो.कॉ माळवे, पो.कॉ पवार, म.पोकॉ चवरे, म.पोकॉ शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
अधिक वाचा –
– राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू, महाराष्ट्रात लोकसभा उमेदवाराला 95 लाख इतकी खर्चाची मर्यादा
– ‘मावळ लोकसभा निवडणूकीत संजोग वाघेरे भरघोस मतांनी विजयी होणार!’ मावळसाठी इंडिया आघाडीने कंबर कसली
– पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना, नव्या परिमंडळाची निर्मिती, कोणते पोलिस ठाणे कोणत्या परिमंडळात? पाहा