व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळ लोकसभा निवडणूकीत संजोग वाघेरे भरघोस मतांनी विजयी होणार!’ मावळसाठी इंडिया आघाडीने कंबर कसली

मावळ लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील सर्व राजकीय पक्ष आणि संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठक बुधवारी (दिनांक 14 मार्च) पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 17, 2024
in लोकल, ग्रामीण, महाराष्ट्र, व्हिडिओ
Maval-Lok-Sabha-sanjog-waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील सर्व राजकीय पक्ष आणि संघटना यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठक बुधवारी (दिनांक 14 मार्च) पार पडली. श्री क्षेत्र पंचायतन मंदिर, नढाळ चौक, पनवेल कर्जत रोड येथे ही बैठक पार पडली. बैठकीला प्रमुख मार्दगर्शक म्हणून सचिन अहिर हे उपस्थित होते. ‘लोकशाही संपविण्याचा प्रयत्न हुकूमशाही माध्यमातून सुरू आहे. देशाच्या हितासाठी, तसेच गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सर्व मिळून आपली ताकद पणाला लावू आणि आगामी निवडणुकीत मावळ लोकसभेवर इंडिया आघाडीचा झेंडा फडकवू,’ असे आवाहन सचिन अहिर यांनी यावेळी उपस्थितांना केले. तसेच, मावळ लोकसभेतील इंडिया आघाडीच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संजोग वाघेरे यांना बहुमतांनी विजयी करण्याचा निश्चय केला.

देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असून भाजप सरकार संविधान संपवण्याचे काम करत असल्याचे सांगत सचिन अहिर यांनी आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.‌ तसेच, ‘मावळ लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा. जे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे होऊ शकले नाहीत, ते‌ तुमचे आणि आमचे काय होणार? इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघरे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे काम आपल्याला करायचे आहे,’ असे‌ आहिर म्हणाले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मावळ लोकसभेच्या विकासासाठी कटिबद्ध – संजोग वाघेरे
पुणे आणि रायगड अशा दोन भागात विस्तारलेला हा मावळ लोकसभा मतदारसंघ अनेक अर्थाने महत्वाचा आहे. या मतदारसंघात वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळ्या समस्या आहेत. सोबतच्या आपल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन या समस्या सोडवण्यासाठी, तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचा विकास घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले.‌‌ ( Maval Lok Sabha Constituency Election India Alliance office bearers meeting at Panvel Sanjog Waghere Will Win )

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळासाहेब पाटील, शिवसेना उरणचे माजी आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रायगड जिल्ह्याचे प्रभारी प्रशांत पाटील, शिवसेना नेते समन्वयक बबन पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे प्रितम म्हात्रे, पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, श्रीनाथ पाटील, आम आदमी पार्टीचे पनवेल विधानसभा अध्यक्ष शेखर जांभळे, पनवेल समाजवादी पार्टीचे अध्यक्ष नाईक साहेब, काँग्रेसचे पनवेल विधानसभा अध्यक्ष सुदाम पाटील, मावळ लोकसभा समन्वयक (शरदचंद्र पवार गट) सुवर्णा जोशी, भावणा घाणेकर, खालापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष जंगम यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आदी यावेळी उपस्थित होते.

मावळ मतदार संघ महाविकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची विशेष बैठक श्री क्षेत्र पंचायतन मंदिर, नढाळ चौक पनवेल कर्जत रोड येथे संपन्न झाली..???? pic.twitter.com/TEQkGcstrk

— Sachin Ahir (@AhirsachinAhir) March 14, 2024

अधिक वाचा –
– मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड । Talegaon Dabhade
– आचारसंहिता लागण्याआधीच आमदार सुनिल शेळकेंनी मावळ तालुक्यासाठी खेचून आणला भरघोस निधी । MLA Sunil Shelke
– लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं, देशात सात टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी अंतिम मतमोजणी, वाचा A टू Z माहिती


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना, नव्या परिमंडळाची निर्मिती, कोणते पोलिस ठाणे कोणत्या परिमंडळात? पाहा

Next Post

राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू, महाराष्ट्रात लोकसभा उमेदवाराला 95 लाख इतकी खर्चाची मर्यादा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
EC-Maharashtra-PC

राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू, महाराष्ट्रात लोकसभा उमेदवाराला 95 लाख इतकी खर्चाची मर्यादा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.