व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव-कातवीमधील 250 एकर औद्योगिक क्षेत्र संपादनमुक्त, स्थानिकांना मोठा दिलासा; आमदार सुनिल शेळकेंची माहिती

महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक विभागाने 18 वर्षांपूर्वी संपादित केलेल्या वडगाव व कातवी हद्दीतील सुमारे 94 हेक्टर म्हणजे सुमारे 250 एकर क्षेत्र विनाअधिसुचीत करण्याचा निर्णय झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 18, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
vadgaon-maval-katavi-sunil-shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक विभागाने 18 वर्षांपूर्वी संपादित केलेल्या वडगाव व कातवी हद्दीतील सुमारे 94 हेक्टर म्हणजे सुमारे 250 एकर क्षेत्र विनाअधिसुचीत करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे संबंधित जमिनी या औद्योगिक विभागाच्या संपादनातून मुक्त झाल्या असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

वडगाव शहर व कातवी या दोन्ही गावांच्या मध्यावर, रेल्वे लाईनलगत असणारे 94 हेक्टर क्षेत्र हे औद्योगिक विभागाने सन 2006 मध्ये संपादित करण्याचा निर्णय घेतला आणि सन 2008 मध्ये प्रत्यक्ष कार्यवाही होऊन संबंधित क्षेत्र हे संपादित झाले होते. तेव्हापासून आजतागायत संबंधित जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर एमआयडीसीचे शिक्के आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाही लाभ घेता येत नव्हता. ( decision to free acquisition of 250 acres of industrial land in vadgaon maval and katavi areas )

आमदार शेळके यांचा यशस्वी पाठपुरावा –
संबंधित क्षेत्र संपादित झाले तेव्हापासूनच शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे जागा संपादित होऊनही त्याठिकाणी पुढील कार्यवाही होऊ शकली नाही.दरम्यान, संबंधित क्षेत्र संपादनातून मुक्त करावे यासाठी आमदार सुनिल शेळके यांनीही यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, 20 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित क्षेत्र विना अधिसूचित करण्याबाबत अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. अखेर त्यास शासनाचे सह सचिव संजय देगावकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता संबंधित क्षेत्र हे संपादनातून मुक्त झाले असून लवकरच सातबारा उतारावरील संपादनाचे शेरेही काढले जातील. मागील अठरा वर्षांपासून नागरिकांकडून होत असलेल्या मागणीला यश मिळणार असुन यामुळे या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

“वाढत्या नागरिकीकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या वडगाव व कातवी हद्दीतील सुमारे 250 एकर संपादित क्षेत्र हे औद्योगिक विभागातुन मुक्त झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकीकरण वाढत असल्याने या जमिनींना अनन्यसाधारण महत्व आहे. कृपा करुन शेतकऱ्यांनी जमीन न विकता ती विकसित करावी किंवा व्यवसाय करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक आहे.” – आमदार सुनिल शेळके

अधिक वाचा –
– वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला सरकारची मान्यता, अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश
– ‘सलोनी मोतीबने’ ठरल्या सौ-भाग्यवती मावळ 2024; कामशेत येथे 40 हजार महिलांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम
– राज्यात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू, महाराष्ट्रात लोकसभा उमेदवाराला 95 लाख इतकी खर्चाची मर्यादा


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील 71 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय, तोकड्या कपड्यांनी गेल्यास प्रवेश नाकारणार, वाचा यादी

Next Post

मोठी कारवाई! लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील 32 हजार फलक हटविले, मावळातील आकडा मोठा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Voting

मोठी कारवाई! लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील 32 हजार फलक हटविले, मावळातील आकडा मोठा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.