कुलस्वामिनी महिला मंच मावळ यांच्या वतीने मावळ तालुक्यातील महिलांसाठी खास सौ-भाग्यवती मावळ 2024 हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गेम शोमधून प्रथम क्रमांक विजेत्या व मानाची पैठणीच्या मानकरी वडगावच्या सलोनी मोतीबने आणि लकी ड्रॉ मधील दुचाकीच्या मानकरी ब्राम्हणवाडीच्या ज्योती विनोदे या ठरल्या आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
कामशेत येथील मैदानात आयोजित कार्यक्रमाला महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. तब्बल चाळीस हजार महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मावळ तालुक्याला एक सांस्कृतिक वारसा लाभला असून अशा कार्यक्रमांमुळे महिलांना मनसोक्त वावरण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. उपस्थित माता-भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया आयोजिका सारिका शेळके यांनी दिली. ( Sau Bhagyavati Maval 2024 program at kamshet organized by Kulaswamini Mahila Manch Sarika Sunil Shelke )
‘निस्वार्थ भावनेने मायबाप जनतेची नेहमी सेवा करीत असल्याने माय-माऊलींचा आशीर्वाद मिळत आहे. या आशीर्वादाच्या बळावरच विविध कार्यक्रम दरवर्षी करीत आलो. आजच्या कार्यक्रमात माता-भगिनींना सुखदुःखे विसरुन मनसोक्त आनंद घेता आला, हे पाहून मनाला समाधान वाटले.’ – आमदार सुनिल शेळके
मंचावर गेम शोमध्ये सहभागी झालेल्या महिलांचे विविध खेळ, गप्पा चर्चा व हास्यविनोदात कार्यक्रम संपन्न झाला. मानाची पैठणी प्रथम क्रमांकाचे टू व्हीलर बक्षीस सलोनी मोतीबने यांना मिळाले. तर अक्षदा जगताप दुसरा क्रमांक रेफ्रिजरेटर विजेत्या, तिसरा क्रमांक वॉशिंग मशीन विजेत्या भगीरथी मालपोटे, चौथा क्रमांक टिव्ही विजेत्या दर्शना भालेसेन, पाचवा क्रमांक मोबाईल विजेत्या जयश्री येवले या ठरल्या. लकी ड्रॉ मधील कुपन द्वारे दहा भाग्यवान विजेत्या महिलांना पाच ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात आले.
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील परिमंडळांची पुनर्रचना, नव्या परिमंडळाची निर्मिती, कोणते पोलिस ठाणे कोणत्या परिमंडळात? पाहा
– मावळ लोकसभेत भाजपचा खासदार पाहिजे! बारणेंविरोधात मावळ भाजपा आक्रमक, बाळा भेगडेंच्या उमेदवारीसाठी वरिष्ठांना साकडे
– मावळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रजनीगंधा खांडगे, उपाध्यक्षपदी ‘यांची’ निवड । Talegaon Dabhade