व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी कारवाई! लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील 32 हजार फलक हटविले, मावळातील आकडा मोठा

भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 18, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Voting

File Image


भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय जागेतील ११ हजार ८३, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १९ हजार ६५२ आणि खाजगी जागेवरील १ हजार ८१५ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पुणे जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिते पालन काटेकोरपणे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने ३३ मावळ लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ९६१, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे २ हजार ५५२, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २०७, ३४ पुणे लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ७८५, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ४३१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २५७, ३५ बारामती लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ४८८, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे ५ हजार २८१, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे २३२ तर ३६ शिरूर लोकसभा मतदारसंघात शासकीय जागेतील ४ हजार ८४९, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे १० हजार ३८८, खासगी मालमत्तेच्या ठिकाणचे १ हजार ११९ असे एकूण ३२ हजार ५५० जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे कटाक्षाने पालन व्हावे म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज पूर्णपणे हटविण्याची कार्यवाही सुरू असून लवकरच ही कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

अधिक वाचा –
– लोणावळा शहराजवळ अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्यांना पोलिसांचा दणका, हॉटेल मालकासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल । Lonavala Crime News
– वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला सरकारची मान्यता, अजित पवारांच्या पाठपुराव्याला यश
– ‘सलोनी मोतीबने’ ठरल्या सौ-भाग्यवती मावळ 2024; कामशेत येथे 40 हजार महिलांच्या उपस्थितीत डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव-कातवीमधील 250 एकर औद्योगिक क्षेत्र संपादनमुक्त, स्थानिकांना मोठा दिलासा; आमदार सुनिल शेळकेंची माहिती

Next Post

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांचा रूट मार्च । Kamshet Police Route March

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Police-Route-March

लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांचा रूट मार्च । Kamshet Police Route March

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
Groundbreaking ceremony for three road projectsincluding Talegaon-Chakan-Shikrapur elevated highway

मावळच्या कनेक्टिव्हिटीला नवी गती ! तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्गासह तीन रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

July 17, 2026
order imposing Section 163 in Lonavala rural area has been revoked all tourist spots are now open to visitors

मोठी बातमी! लोणावळा ग्रामीण परिसरातील कलम १६३ लागू केलेला आदेश रद्द; सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी विनाअट खुली

July 17, 2026
warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.