मॅनेजर सतत काम सांगत असल्याचा राग मनात धरून कामगाराने मॅनेजरला मृत्यू होईल इतपत गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान मारहाणीचा हा गंभीर प्रकार घडला. त्यानंतर मॅनेजर सुधीर मच्छिंद्र अडसूळ (वय 47, रा. बेबड ओहळ ता. मावळ मूळगाव बाभूळगाव ता.बार्शी सोलापूर) यांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
याप्रकरणी कंपनीतील कर्मचारी किरण मानसिंग भोसले (वय 47, रा. मावळ) यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मारहाण करणारा आरोपी अर्थात कंपनीतील कामगार कुमार ओझरकर (वय 25, रा. शिवणे, मावळ) याला अटक केली आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. ( worker killed manager sensational incident in maval taluka )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मॅनेजर सुधीर अडसूळ व आरोपी कुमार ओझरकर हे एग्रो कंपनीत कामाला होते. मॅनेजर अडसूळ हे आरोपी ओझरकर याला कंपनीत काम सांगत होते. त्यावरुन त्यांच्यात अनेकदा खटके उडाले होते. त्याचा राग आरोपी कुमार ओझरकर याने मनात ठेवून मंगळवारी (दि.19) सायंकाळी मॅनेजर अडसूळ दुचाकीवरून घरी जात असताना, आरोपी ओझरकर आणि त्याचा साथीदार याने पाठलाग करून त्यांना अडवले. त्यांना डोक्यात आणि सर्वांगावर मारहाण करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात सोडून फरार झाले. घटनास्थळी शिरगाव परंदवडी पोलिसांनी धाव घेऊन गंभीर जखमी अडसूळ याला सोमाटणे फाटा पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान मॅनेजर अडसूळ यांचा बुधवारी (दि.20) सायंकाळी 5 वा. मृत्यू झाल्याचे घोषित केले. मॅनेजर च्या मागे पत्नी, दोन मुले व आई वडील आहेत घराचा आधार गेल्याने दुः खाचा डोंगर कोसळला.
सदर खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक प्रकाश पारखे करत आहेत. याप्रकरणी सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आता खुनाच्या गुन्ह्याची कलमवाढ केली जाणार आहे. आरोपी कुमार याला बुधवारी दुपारी अटक करण्यात आली आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेतले आहे.
अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूक काळात कुणीही आचारसंहितेचा भंग केल्यास ‘या’ नंबरवर फोन करून करा तक्रार । Lok Sabha Election 2024 Code of Conduct
– लोकसभा निवडणूकीदरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांचा रुटमार्च । Vadgaon Maval Police Route March
– ‘शिर्डी मतदारसंघ साहेबांना सोडा.. नाहीतर मावळ आणि शिरूरमध्ये नोटाला मतदान करू’, भाजपाला कुणी दिलाय हा इशारा? वाचा