व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 10, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा येथे अश्लील व्हिडिओ तयार करणारी टोळी गजाआड; पाटणमधील बंगल्यावर पोलिसांचा छापा, 5 महिलांसह 18 जण ताब्यात

लोणावळा शहराजवळ पॉर्न व्हिडिओ (अश्लील चित्रफित) तयार करणाऱ्या एका मोठ्या टोळीला अटक करण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 30, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर
lonavala-Porn-Film-Shooting-Racket

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा शहराजवळ पॉर्न व्हिडिओ (अश्लील चित्रफित) तयार करणाऱ्या एका मोठ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून लोणावळा शहराजवळील एका बंगल्यात हा सर्व गोरख धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र आले होते आणि पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून 13 पुरुष आणि 5 महिलांना ताब्यात घेतले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत देशामध्ये अश्लील व नग्न चित्रीकरणास तसेच प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगनमताने अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तीन जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि कलम 292, 293, 34 माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67, 67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3, 4, 6, 7 प्रमाणे शुक्रवारी (29 मार्च) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ( Lonavala Gramin Police Bust Porn Film Shooting Racket in Bungalow 5 Women Among 18 Arrested )

याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक भारत भोसले यांनी सरकारी फिर्याद दिली आहे. 29 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या पूर्वी पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या आर्णव व्हीला या बंगल्यात सदरचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ अधिकचा तपास करत आहेत.

अधिक वाचा –
– ‘तुम्ही निवडून यालच..आपल्याला हा गड राखायचाय’, उद्धव ठाकरे यांच्याकडून संजोग वाघेरेंना प्रचार सुरु करण्याचे आदेश
– वडगाव मावळ शहरात राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा । Vadgaon Maval
– निलेश लंकेंचा अजितदादांना ‘रामराम’, आमदारकीचा राजीनामा देताना अश्रू अनावर, लोकसभेची ‘तुतारी’ फुंकली । mla nilesh lanke resigned ncp


Previous Post

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतले स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन; चिंचवडमधून प्रचाराला सुरुवात

Next Post

शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी 5 शिलेदारांची नावे जाहीर, अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी, पाहा यादी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sharad-Pawar

शरद पवार यांच्याकडून लोकसभेसाठी 5 शिलेदारांची नावे जाहीर, अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी, पाहा यादी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Birsa Brigade Adivasi Vicharmanch Maval celebrated World Tribal Day at Wadeshwar Maval

बिरसा ब्रिगेड व आदिवासी विचारमंच मावळ यांच्या वतीने वडेश्वर येथे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा । Maval News

August 10, 2025
Cardiac ambulance at the primary health center in Takve Budruk Maval

टाकवे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका’ रुग्णांच्या सेवेत । Maval News

August 10, 2025
Free cervical health check-up camp organized for women in Andar Maval division

आंदर मावळ विभागातील महिलांसाठी मोफत गर्भाशय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन । Andar Maval

August 10, 2025
Roaming Lok Adalat is becoming ray of hope for deprived sections of society Citizens are satisfied

‘फिरते लोकअदालत’ ठरतंय न्यायापासून वंचित घटकांकरिता आशेचा किरण ; गावातच न्याय मिळाल्यामुळे नागरिक समाधानी

August 10, 2025
Indian-Railway

पुणे जिल्ह्यातील रेल्वेचे जाळे अधिक सक्षम होणार ! बहुचर्चित तळेगाव ते उरळी रेल्वे बाह्यवळण मार्गाचा डीपीआर तयार । Talegaon – Urali Railway

August 10, 2025
Solar Panel Schemes

तळेगाव स्टेशन येथे आज पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत गृहरचना संस्थांना द्यावयाच्या सबसिडी बाबत चर्चासत्र । Maval News

August 10, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.