वडगाव मावळ शहरात शनिवारी (दि. 20 एप्रिल) महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या खळ्ळं खट्याक आंदोलनाचा दणका पाहायला मिळाला. वडगाव मावळ शहरातील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान मंदिराजवळच सुरु असलेल्या एका अवैध ताडी (मद्य) विक्री केंद्रावर मनसेने बुलडोझर चालवला. अवघ्या अर्ध्या तासात मनसेने हा ताडी विक्रीचा अड्डा जमीनदोस्त केला. मनसेच्या या कारवाईचे नागरिकांकडून कौतूक केले जातंय. जे काम नगरपंचायत प्रशासन, पोलिस प्रशासन यांनी करायला हवं होतं, मनसेने केल्याचे बोलले जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘‘गावतळ्याजवळील धार्मिक स्थळांच्या आवारात अवैधरित्या ताडीची विक्री केली जात आहे. नशेबाजांचा रहिवाशांना नाहक त्रास करावा लागत आहे. त्यामुळे, हे केंद्र त्वरित बंद केले जावे,’’ अशी मागणी वडगावच्या माजी उपनगराध्यक्षा, मनसे नेत्या सायली म्हाळसकर यांनी केली होती. परंतू प्रशासनाने योग्य पाऊले न उचलल्याने आपण स्वतः ही कारवाई केली, असे सायळी म्हाळसकर यांनी सांगितेल. तसेच यावेळी मनसेचे तालुका प्रमुख रुपेश म्हाळसकर हे स्वतः आणि पक्षाचे कार्यर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( MNS bulldozed an illegal liquor outlet near Potoba Maharaj Temple In Vadgaon Maval ः
अधिक वाचा –
– एक्सप्रेस वेवरील अपघात कमी करण्यासाठी वाहनांना नवीन वेगमर्यादा लागू, बोरघाटात गाडीचं स्पीड किती असावं? जाणून घ्या
– मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडीकडून मावळ लोकसभेसाठी ‘माधवी जोशी’ यांना उमेदवारी जाहीर । Maval Lok Sabha
– लायन्स क्लबकडून खोपोली महोत्सवाचे आयोजन, पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Khopoli News