President Murmu Presents Padma Awards : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 132 मान्यवरांना आज (दि. 23 एप्रिल) पद्म पुरस्काराने नवी दिल्ली येथे सन्मानित केले. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मान्यवरांचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना पद्म पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री राम नाईक (सार्वजनिक सेवा), दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त (कला) यांना पद्मभूषण तर डॉ. मनोहर कृष्ण डोळे (औषधी), डॉ. जहीर इसहाक काझी ( साहित्य), कल्पना मोरपारिया (उद्योग) यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ( Distribution of Padma Awards by President Draupadi Murmu in New Delhi including 5 from Maharashtra )
राष्ट्पती भवनातील एका शानदार समारंभात पद्य पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परराष्ट्र मंत्री, एस.जयशंकर तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते. प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील पाच मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अधिक वाचा –
– आदर्श जिल्हा परिषद शाळा चंदनवाडी येथे शाळा पूर्व तयारी अभियान उत्साहात । Maval News
– मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, मविआचे ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित । Maval Lok Sabha
– पुणे रिंगरोडसाठी 12 कंपन्यांकडून निविदा सादर, MSRDC कडून निविदांची छाननी सुरु, ‘या’ 9 भागात होणार रिंग रोड । Pune Ring Road