व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, October 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे रिंगरोडसाठी 12 कंपन्यांकडून निविदा सादर, MSRDC कडून निविदांची छाननी सुरु, ‘या’ 9 भागात होणार रिंग रोड । Pune Ring Road

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड साकारण्यात येत आहे. सुमारे 136.80 किलोमीटर लांबीच्या या चक्राकार मार्गासाठी देशासह परदेशातील सुमारे 12 कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 22, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Pune-Ring-Road

Photo Courtesy : Team Dainik Maval


पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड साकारण्यात येत आहे. सुमारे 136.80 किलोमीटर लांबीच्या या चक्राकार मार्गासाठी देशासह परदेशातील सुमारे 12 कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या सर्व कंपन्यांनी सादर केलेल्या निविदांची तांत्रिक छाननीची प्रक्रिया राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरू केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा हा रिंग रोड पूर्व आणि पश्चिम पट्ट्यात होणार असून त्यासाठी आतापर्यंत सुमारे 70 टक्के जमीन संपादित झाली आहे. प्रकल्पासाठी सुमारे 28 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुरंदर, भोर, हवेली, खेड, मावळ तालुक्यामधून हा रिंग रोड जात असून एकूण नऊ पॅकेजमध्ये रिंगरोड साकारण्यात येईल. त्या दृष्टीने रस्ते विकास महामंडळाने निविदा जाहीर केल्या आहेत. देशासह परदेशातील विविध बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. या कामासाठी यापूर्वीच कंपन्यांची पात्रता निश्चित करण्यात आली होती. 28 कंपन्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी सुमारे 19 कंपन्या पात्र ठरल्या होत्या. त्यातीलच कंपन्यांनी नऊ पॅकेजससाठी निविदा सादर केल्या आहेत. ( Tenders submitted by 12 companies for Pune Ring Road Scrutiny of tenders started by MSRDC )

नऊ पॅकेजेस कोणती?
पूर्व 1 (11.85 किमी) : उर्से ते इंदोरी (मावळ तालुका)
पूर्व 2 (13.80 किमी) : इंदोरी ते चिंबळी (मावळ, खेड)
पूर्व 3 अ आणि ब (21.20 किमी) : चिंबळी ते सोलू (ता. खेड) आणि सोळू ते लोणीकंद (ता. खेड, मावळ)
पूर्व 4 (24.50 किमी) : लोणीकंद जवळील वालटी (ता. हवेली)

पश्चिम 1 (14.65 किमी) : उर्से ते केमसेवाडी (ता. मावळ- मुळशी)
पश्चिम 2 (20 किमी) : केमसेवाडी ते मोरेवाडी (ता. (मुळशी)
पश्चिम 3 (14 किमी) : मोरेवाडी ते वर्दाडे खेमगाव (मावळ, मुळशी, हवेली)
पश्चिम 4 ( 7.50 किमी) : वर्दाडे खेमगाव मावळ ते कल्याण रहाटवडे (हवेली)
पश्चिम 5 (9.30 किमी) : कल्याण रहाटवडे ते शिवरे कुसेगाव (हवेली, भोर)

रिंग रोडसाठी निविदा सादर केलेल्या कंपन्यांच्या निविदांची तांत्रिक छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर कंपन्यांच्या निविदांची आर्थिक छाननी केली जाईल. जूनमध्ये आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर त्याबाबतचा अंतिम प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल. त्यानंतर पात्र कंपन्यांना कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात येतील.

अधिक वाचा –
– मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणेंकडून मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha
– पावसाळ्यात मुंबई-पुणे रेल्वे सेवा चालणार सुरळीत, मध्य रेल्वेकडून कर्जत-लोणावळा घाटाची पाहणी, मान्सूनपूर्व कामांनी घेतला वेग
– अभिनंदन! सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार’


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावमधील स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो तांब्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा । Talegaon Dabhade

Next Post

मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, मविआचे ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sanjog Vaghere Patil

मावळ लोकसभेसाठी संजोग वाघेरे मंगळवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज, मविआचे 'हे' दिग्गज नेते राहणार उपस्थित । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.