लोणावळा शहर पोलिसांनी ( Lonavla City Police ) खंडाळा ( Khandala ) येथे मारलेल्या छाप्यात बेकायदा, विना परवाना साठवणूक केलेली 6 हजार रुपये किमतीची शिंदी आणि वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई स्वप्नील जगदिष पाटील (पोलिस काॅन्स्टेबर, लोणावळा शहर पोलीस) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी प्रकाश रामा माडे (वय 35 वर्ष, रा. ठाकरवाडी) विरोधात लोणावळा शहर पोलीस स्टेशन म.प्रो.का. कलम 65 (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Illegal shindi stock seized at khandala by lonavla city police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्त माहितीच्या आधारे रविवार 7 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी पाऊणेसहाच्या सुमारास पोलिसांनी खंडाळा येथे कारवाई केली. यावेळी आरोपीने खंडाळा येथे त्याच्या घराजवळ असलेल्या नगरपालिकेच्या जागेवर भिंतीच्या आडोशाला विविध वस्तूत शिंदी ची ( Phoenix sylvestris ) साठवणूक केल्याचे आढळून आले. पोलिसांनी एकुण 6425 रुपयांची आंबट उग्रवासाची शिंदी जप्त केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस हवालदार घोटकर हे करत आहेत.
अधिक वाचा –
– भयंकर! रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृत्यू, रेल्वे अंगावरुन गेल्याने शरीराच्या अक्षरशः ठिकऱ्या
– महाविद्यालयीन तरुणाची टोळक्याकडून हत्या, तळेगाव दाभाडेतील खळबळजनक घटना