तळेगाव दाभाडे येथील श्री संत गोरोबाकाका सेवा मंदिर, कुंभार वाडा येथे श्री संत गोरोबाकाका यांचा पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम सोमवार, दिनांक 6 मे रोजी अतिशय भक्तीभाव वातावरणात संपन्न झाला. सकाळी 7 वाजता श्रींचा महाभिषेक आणि महापुजा नामदेव दरेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर सकाळी 8 वाजता संतोष दगडू कुंभार (अध्यक्ष पुणे जिल्हा कुंभार समाजोन्नती मंडळ, पुणे) सुहास बळीराम गरुड (माजी सभापती शिक्षण मंडळ, त.दा. न.प. ) केदार रख भेगडे (मा. अध्यक्ष डोळसनाथ महाराज उत्सव समिती) हभप श्री शिवाजी महाराज सुतार (मृदुंगाचार्य) या मान्यवरांच्या हस्ते गोरोबा काकांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.
सकाळी 11 ते दु. 12 या दरम्यान संत गोरोबाकाकांच्या पुण्यस्मरणानिमित्त हभप पांडुरंग कार्लेकर गुरुजी यांची प्रवचन रुपी सेवा पार पडली. दुपारी 3 वाजता हभप बाळकृष्ण मारुती आरडे (विश्वस्त विठ्ठल मंदिर तळेगाव दाभाडे ) यांच्या हस्ते पालखी पूजन संपन्न झाले. दुपारी 3 ते 5 यावेळेत भजन व नामघोषाच्या गजरात संत गोरोबाकाकांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सायं 6 वा. संतोष छबुराव भेगडे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. सायंकाळी 6 ते 8 या दरम्यान हभप उद्धव महाराज अटाळीकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले. त्यानंतर 8 वा. महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातून असंख्य कुंभार समाज बांधव उपस्थित होते. तसेच तळेगावातील आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, राजकीय, धार्मिक, वारकरी संप्रदायातील विविध मान्यवर उपस्थित होते. ( Various religious programs On Occasion Of Sant Goroba Kaka Punyatithi at Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
– आंबी येथे पोलिसांच्या छाप्यात 5000 लीटर गावठी दारूचे रसायन जप्त, एकावर गुन्हा दाखल । Maval Crime
– “मावळच्या विकासासाठी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही”, वाचा कोणी म्हटलंय असं… । Maval Lok Sabha
– दुर्दैवी ! गावी आलेल्या आत्याचा अपघाती मृत्यू, शिरगाव-कासारसाई रस्त्यावरील घटना, अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा