देशभर सध्या लोकसभा निवडणूकीची धामधूम आहे. वेगवेगळ्या टप्प्यात लोकसभा मतदार संघाचे मतदान पार पडत आहे. लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. येत्या 13 मे रोजी मावळसाठी मतदान होणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ लोकसभेसाठी 13 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस चे कामशेत पोलिस स्टेशन यांकडून आज, शुक्रवारी (दि. 10) रूट मार्च काढण्यात आला. कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सायंकाळी 5 ते 5.30 दरम्यान हा रूट मार्च काढण्यात आला. ( route march by Kamshet police in view of polling in Maval Lok Sabha constituency )
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कामशेत बाजारपेठ मेन रोड, पंडित नेहरू शाळा व खडकाळे मतदान केंद्र परिसर, गावठाण, शिवाजी चौक, पवना चौक, नाने चौक इत्यादी भागात हा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्च मध्ये कामशेत पोलीस स्टेशनकडील आणि KSRP पोलीसचे असे एकूण 10 अधिकारी व एकूण 48 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा एएसपी सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामशेत पोलिसचे पीआय रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात रूटमार्च/ शक्ती प्रदर्शन करण्यात आले.
अधिक वाचा –
– ‘कामच करून टाकेन…’, मावळमध्ये विरोधी उमेदवाराचा आतून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादांचा सज्जड दम !
– अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य ! Pune News
– ट्रक-टेम्पो आणि कार, खोपोलीजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात; 3 जण ठार, 8 जखमी । Accident On Mumbai Pune Expressway