मावळ लोकसभा मतदासंघांतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, दिव्यांग, युवा, वैशिष्ट्यपूर्ण (युनिक) आणि आदर्श अशा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून आवश्यक सुविधांनी युक्त अशा निवडक २८ मतदान केंद्रांची जबाबदारी महिला व युवक0 सांभाळणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशी वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी, सुरक्षेसाठी नियुक्त पोलीस असे सर्वच महिला कर्मचारी आहेत. युवा संचलित मतदान केंद्रावर सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी युवा वयोगटातील आहेत. आदर्श मतदान केंद्रावर सर्व सेवासुविधा तसेच आवश्यक त्या अतिरिक्त सुविधा देण्यात येतात. युनिक मतदान केंद्रे ही वेगवेगळ्या संकल्पनेवर (थीम) सजविण्यात येणार आहेत. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघ निहाय अशी केंद्रे स्थापित करण्यात येणार आहेत. यामध्ये १४ महिला संचलित, १४ युवा मतदान केंद्र आणि ६ आदर्श मतदान केंद्र असे एकूण ३४ विशेष मतदान केंद्र स्थापित केले जातील. ( Maval Lok Sabha Constituency Election 2024 Updates )
उरण विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून नागरी संरक्षण गट कार्यालय बोरी प्रशिक्षण केंद्र, उर्दू नागरिक प्राथमिक शाळा उरण, उरण एज्युकेशन सोसायटीचे उरण इंग्लिश मिडीयम स्कूलमधील खोली, कोकण ज्ञानपीठ कॉलेज कार्यालयाजवळील खोली व सिटीझन हायस्कूलमधील खोली असे ५ महिला संचलित मतदान केंद्र, रायगड जिल्हा परिषद शाळेतील खोली, रायगड जिल्हा परिषद शाळा कराळ मधील खोली, रायगड जिल्हा परिषद शाळा दिघोडे येथील खोली, रायगड जिल्हा परिषद शाळेतील खोली व ग्रामपंचायत कार्यालय करंजादे तळमजला हॉल असे ५ युवा संचलित मतदान केंद्र तर आदर्श मतदान केंद्र रायगड जिल्हा परिषद शाळा, खोपटे बांधपाडा नवीन इमारतीत स्थापित केले जाणार आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात किवळे येथील पेंडसे कॉलनी विकासनगर मधील विद्याभुवन शाळेत महिला संचलित मतदान केंद्र, बाबूरावजी घोलप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात युवा संचलित मतदान केंद्र तर रावेत येथील सिटी प्राईड शाळेतआदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत. पनवेल विधानसभा मतदारसंघात के.ई. एस. आय. जे. चे वाजेकर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे महिला संचलित मतदान केंद्र, के.ई. एस. हायस्कूल पनवेल येथे युवा मतदान केंद्र तर पनवेल महानगरपालिकेच्या प्री गुजराती शाळेत आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत.
कर्जत विधानसभा मतदारसंघात रायगड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, दहिवली येथील जनता विद्यामंदिर प्राथमिक शाळा, खोपोली नगरपरिषदेची बालवाडी, शिलाफाटा येथील सह्याद्री विद्यालय व खोपोली येथील कॅरमेल कॉन्व्हेंट स्कूल अशी ५ महिला संचलित मतदान केंद्रे आहेत. तर नेरळ येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तिघर येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंजारून येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खारवई येथील जिल्हा परिषद मराठी शाळा व खोपोली येथील जनता विद्यालयात अशी ५ युवा मतदान केंद्र मतदान केंद्र, तर अभिनव ज्ञानमंदिर प्राथमिक शाळेतील खोलीमध्ये आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहेत.
मावळ विधानसभा मतदारसंघात महिला संचलित मतदान केंद्र म्हणून जांभूळ येथील जिल्हा परिषद शाळा खोली, युवा संचलित मतदान केंद्र म्हणून वडगाव येथील रमेशकुमार सहाणे इंग्लिश मीडियम स्कूलमधील खोली तर आदर्श मतदान केंद्र ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल, लोणावळा येथे स्थापित करण्यात येणार आहेत.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात पिंपरी येथे मघनमल उधाराम वाणिज्य महाविद्यालयात महिला संचलित आणि युवा मतदान केंद्र, तर दापोडी येथील गणेश इंग्लिश मीडियम स्कूल येथे आदर्श मतदान केंद्र स्थापित करण्यात येतील.
मतदारांनी आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation तसेच मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. येत्या १३ मे रोजी अधिकाधिक पात्र मतदारांनी मतदान करुन या लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. सिंगला यांनी केले आहे.
अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कामशेत पोलिसांकडून शहरात शक्ती प्रदर्शन ! Kamshet News
– ‘मी मॅच फिक्सिंग करत नाही…’ संजोग वाघेरेंसोबत ‘तेव्हा’ नेमकं काय झालं? अजितदादांनी सर्वांसमोर स्पष्ट केलं, वाचा… । Maval Lok Sabha
– मतदान करताना फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास होणार कारवाई ! मतदारांनी थिल्लरपणा टाळून मतदान करण्याचे आवाहन