ज्या शाळेत शिकलो आणि ज्या शिक्षणाच्या जोरावर मोठमोठ्या पदावर विराजमान झालो, ती शाळा कधी विसरायची नसते. जर पुन्हा शाळेत जायची वेळ आली किंवा योग आला तर जायचं असतं, आणि ह्याच विचाराने कार्ला येथील एकविरा विद्यालयात 20 वर्षांपूर्वी सोबत शिकलेले सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. तब्बल 20 वर्षांनी त्यांची शाळा पुन्हा भरली आणि आठवणींची घंटा जोरजोरात वाजू लागली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
श्री एकविरा विद्या मंदिर कार्ला शाळेतील इयत्ता दहावीची 2004-05 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांंचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळा, शिक्षक आणि वर्गमित्र हे त्यांच्या जीवनात किती महत्वाचे आहेत, आणि जिवनाला कलाटणी देणारे आहेत हे सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. ( Ekvira Vidyalaya Karla School Alumni Gathering )
समारंभासाठी शाळेचे तत्कालीन प्राचार्य संजय वंजारे, इयत्ता दहावीला अध्यापन करणारे माजी अध्यापक रामभाऊ पोटे, दशरथ ढमढेरे, विलास येवले, छाया मोरे, सुनिल बोरुडे, शहादेव जाधव, काकासाहेब भोरे, संतोष हुलावळे, उमेश इंगुळकर, मधुकर गुरव, बाबाजी हुलावळे या सर्व शिक्षकांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शालेय कार्यकालात मिळणाऱ्या दुकानातील खाद्य पदार्थ बोरकूट, चिंच, सागर मलाई यांची पद्धत शीर मांडणी केली होती. या जुन्या आठवणीने विद्यार्थी भावूक झालेले दिसले.
या एक दिवसीय शाळेची सुरुवात शाळेची घंटा वाजवून राष्ट्रगीत म्हणत झाली. राष्ट्रगीतानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. त्यानंतर बॅचमधील ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांना देवाज्ञा झाले आहे, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संपूर्ण उत्साही वातावरणात प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख “मी सध्या कोण” या सदरातून करून दिली. सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शाळेविषयीच्या आठवणी जागृत केल्या. माजी विद्यार्थ्यांकडून शालेय उपयोगी शाळेला भेट वस्तू देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गायखे, सुवर्णा भानुसघरे, कैलास हुलावळे, राखी शेलार यांनी केले. त्यानंतर या एक दिवसीय शाळेत मधली सुट्टी पण देण्यात आली. या सुट्टीत सर्व शिक्षक, माजी विद्यार्थी यांनी डब्बा खाण्याचा आस्वाद घेतला. यानंतर माझ्या आठवणी मधील एक एक तास वर्गात घेण्यात आला. नंतर संगीत खुर्ची घेत एक दिवसीय शाळेची सांगता वृक्षारोपण करून झाली. स्नेहमेळावा यशस्वीतेसाठी 2004-05 बॕचच्या सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी विशेष प्रयत्न केले.
अधिक वाचा –
– ‘नशीब माझं, बारणे मला ओळखायला लागले’, प्रचाराची सांगता करताना संजोग वाघेरे यांची श्रीरंग बारणेंवर खोचक टीका
– ‘ती जबाबदारी माझी..’ मावळ लोकसभा निवडणूकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आमदार सुनिल शेळकेंचे मतदारांना आवाहन !
– तळेगावातील ‘त्या’ रस्ते खोदकामाची चौकशी व्हावी; आमदार सुनिल शेळके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी । Talegaon Dabhade