पुणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांतता, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी येत्या १३ मे रोजी पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरासाठी जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
हे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये निर्गमित करण्यात आले असून याद्वारे सर्व वाणिज्यिक आस्थापना, सर्व मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस फोन, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर विद्युत उपकरणे तसेच चिन्हांचे प्रदर्शन करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहेत. ( Prohibitory order within 100 meters of polling station Pune Lok Sabha Election )
पुणे, मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी सकाळी ६ वाजेपासून मतदान संपेपर्यंत मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मतदारांव्यतिरिक्त प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतूद व भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ नुसार दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील, असेही डॉ. दिवसे यांनी कळविले आहे.
अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News
– मतदारांनो… मतदानाला जाताना ‘या’ 12 पैकी एक ओळखीचा पुरावा स्वतःजवळ नक्की न्या ! । Lok Sabha Election
– बोटीसह 525 वाहने आणि 12 हजार अधिकारी-कर्मचारी; मावळ लोकसभेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !