व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्यांचे वाटप, मतदारसंघातील निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण । Maval Lok Sabha

मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाकरिता विधानसभा मतदारसंघ निहाय साहित्यवाटप केंद्रांवरुन मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण आज झाले असून सर्व मतदान पथके मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 12, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval Lok Sabha

Photo Courtesy : FB / DIO PUNE


मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाकरिता विधानसभा मतदारसंघ निहाय साहित्यवाटप केंद्रांवरुन मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण आज झाले असून सर्व मतदान पथके मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या लोकसभा मतदारसंघांतर्गत पनवेल, कर्जत, उरण, मावळ, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतदान पथकांना मतदान साहित्य वितरण करण्यात आले. प्रारंभी सर्व ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना तिसरे अंतिम प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रियेबद्दल तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली. ( Distribution of voting materials for Maval Lok Sabha elections preparation for election voting in constituencies completed )

मावळ लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये २ हजार ५६६ मतदान केंद्रे आहेत. यासाठी आवश्यक असणाऱ्या ७ हजार ६९८ बॅलेट युनिट, २ हजार ५६६ कंट्रोल युनिट आणि २ हजार ५६६ व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. तसेच विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह प्रथमोपचारपेटी, दिशादर्शक फलक, मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य यावेळी सुपूर्द करण्यात आले.

या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच वाहतूक बसेस, जीप तसेच इतर वाहनांवर केंद्र क्रमांक दर्शविण्यात आला होता. नियोजनबद्ध पद्धतीने साहित्याचे वितरण करून पथकांना वाहनांमध्ये बसवून केंद्रस्थळी पोहोचविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंगला यांनी चिंचवड तसेच पिंपरी येथील साहित्य वितरण केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विधानसभा मतदारसंघ निहाय संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. साहित्य वाटपाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय प्रत्येक पथकासोबत स्वतंत्र पोलीस पथक देण्यात आले आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात मतदानप्रक्रियेसाठी १२५ वाहनांची व्यवस्था
पनवेल विधानसभा मतदारसंघातील ५४४ मतदान केंद्रांसाठी २७ टेबलद्वारे मतदान साहित्याचे वितरण पनवेल येथील ए.आर. कालसेकर पॉलिटेक्निक कॉलेज या ठिकाणाहून करण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेले ३ हजार ४०० अधिकारी कर्मचारी १ हजार २०० पोलीस कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. एकूण १ हजार ६३२ बॅलेट युनिट, ५४४ कंट्रोल युनिट आणि ५४४ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले. तसेच ८६ एसटी बसेस, १५ मिनी बसेस, २० जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशा १२५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

कर्जत विधानसभा मतदारसंघात साहित्य वितरणासाठी ४७ टेबल
कर्जत विधानसभा मतदारसंघातील ३३९ मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण कर्जत येथील पोलिस ग्राउंड येथून करण्यात आले. यासाठी ४७ टेबल ठेवण्यात आले होते. १४१ कर्मचाऱ्यांची नेमणूक साहित्य वाटपासाठी करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेसाठी दीड हजार मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण १ हजार १७ बॅलेट युनिट, ३३९ कंट्रोल युनिट आणि ३३९ व्हीव्हीपॅटचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले. वाहतुकीसाठी ४३ एसटी बसेस, २१ मिनी बसेस, ८ जीप, ६ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

उरण विधानसभा मतदारसंघात ३४४ मतदान केंद्रे
उरण मतदारसंघातील ३४४ मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण जसई येथील डी.बी पाटील मंगल कार्यालयातून २५ टेबलच्या माध्यमातून करण्यात आले. वाटपासाठी १०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या विधानसभा मतदार संघासाठी १ हजार ५२० मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तर १ हजार ३२ बॅलेट युनिट, ३४४ कंट्रोल युनिट आणि ३४४ व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले आहेत. मतदान अधिकारी व कर्मचारी यांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी ४१ एसटी बसेस, २२ मिनी बसेस, २८ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर आणि १ बोट अशी ९६ वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत्त. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्धन कासार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

मावळ विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्याचे वितरण
मावळ विधानसभा मतदारसंघातील ३९० मतदान केंद्रांवर आवश्यक मतदान साहित्याचे वितरण तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनीअरिंग कॉलेज या ठिकाणी पार पडले. यासाठी ४५ टेबल मांडण्यात आले होते. या विधानसभा मतदार संघात ३९० मतदान केंद्रे असून याठिकाणी १ हजार ८०२ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच १ हजार १७० बॅलेट युनिट, ३९० कंट्रोल युनिट आणि ३९० व्हीव्हीपॅट वाटप करण्यात आले. यासाठी ४९ एसटी बसेस, २७ मिनी बसेस, २० जीप, ३ ईव्हीएम कंटेनर अशी ९९ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात पीएमपीएमएल बसेससह १४२ वाहनांची व्यवस्था
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांना मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी १०२ पीएमपीएमएल बसेस, २० मिनी बसेस, १६ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी १४२ वाहनांची व्यवस्था करण्यात करण्यात आली. मतदार संघात ५४९ मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान साहित्याचे वितरण थेरगाव येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथून करण्यात आले आहे. साहित्य वाटपासाठी ४८ टेबलची व्यवस्था आणि २०० कर्मचारी, ५० समन्वय अधिकारी आणि मतदान यंत्र व्यवस्थापनासाठी ५० स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान कामकाजासाठी २ हजार ४३६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पथकांकडे १ हजार ६४७ बॅलेट युनिट, ५४९ कंट्रोल युनिट आणि ५४९ व्हीव्हीपॅट सुपूर्द करण्यात आले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया संपन्न
पिंपरी विधानसभा मतदारसंघात ४०० मतदान केंद्र असून मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ७७६ मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान पथकांकडे १ हजार २०० बॅलेट युनिट, ४०० कंट्रोल युनिट आणि ४०० व्हीव्हीपॅटचे वाटप ऑटो क्लस्टर चिंचवड येथील साहित्य वितरण केंद्रातून करण्यात आले आहे. साहित्य वितरणासाठी १६ टेबलची व्यवस्था व १२७ कर्मचारी आणि १० समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. पथकांना मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी ७३ पीएमपीएमएल बसेस, १ जीप, ४ ईव्हीएम कंटेनर अशी ७८ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मतदानाची पूर्ण तयारी करण्यात आली असून अधिकाधिक पात्र मतदारांनी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सिंगला यांनी केले आहे.


dainik maval jahirat

Previous Post

अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मतदान केंद्रांना भेट । Pune Lok Sabha Election

Next Post

नागरिकांनो..! मतदानासाठी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा… । Lok Sabha Election

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Voting

नागरिकांनो..! मतदानासाठी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा... । Lok Sabha Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.