व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मतदान केंद्रांना भेट । Pune Lok Sabha Election

सकाळपासूनच जिल्हाधिकारी डॉ. दिवसे हे मतदान साहित्य वितरण केंद्राला भेट देत होते. या भेटी दरम्यान डॉ. दिवसे यांनी संबंधित मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून साहित्य वितरण करण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 12, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Pune Collector Dr Suhas Diwase

Photo Courtesy : FB / DIO PUNE


पुणे जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात मावळ, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदासंघाकरीता सोमवार १३ मे रोजी मतदान होणार असून गेल्या दोन दिवसापासून शहरात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे शहरातील विविध मतदारसंघातील साहित्य वितरण केंद्र आणि मतदान केंद्रांना भेट देवून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

सकाळपासूनच जिल्हाधिकारी डॉ. दिवसे हे मतदान साहित्य वितरण केंद्राला भेट देत होते. या भेटी दरम्यान डॉ. दिवसे यांनी संबंधित मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून साहित्य वितरण करण्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. तसेच मतदान केंद्रावरील व्यवस्थेचाही आढावा घेतला. साहित्य वितरण प्रक्रिया वेळेत आणि शांततेत पार पाडावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या. पावसाची शक्यता लक्षात घेता ईव्हीएम यंत्राच्या सुरक्षेबाबतही त्यांनी यावेळी सूचना दिल्या. ( In background of unseasonal rain Pune Collector Dr Suhas Diwase visit to polling stations )

पुणे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी कृषी महाविद्यालय येथील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वितरण केंद्र, विश्वशांती गुरुकुल विद्यालय एमआयटी संस्था येथील कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वितरण केंद्र, शेठ दगडुराम कटारिया महाविद्यालय महर्षीनगर येथील पर्वती विधानसभा मतदारसंघाचे साहित्य वितरण केंद्र, हडपसर येथरील केंद्र व अल्पबचत भवन येथील पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या साहित्य वितरण केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.

डॉ.दिवसे यांनी भेटीदरम्यान पाऊस आल्यास घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना केल्या. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशीदेखील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. शहराच्या मध्यवर्ती भागात मतदान केंद्र परिसरातील वाहनतळ व्यवस्थेचीही त्यांनी माहिती घेतली.

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर जमावास प्रतिबंध । Lok Sabha Election 2024
– बोटीसह 525 वाहने आणि 12 हजार अधिकारी-कर्मचारी; मावळ लोकसभेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !
– नागरिकांनो कुठल्याही दबावाला बळी न पडता मतदान करा ! लोणावळा ग्रामीण पोलिसांचा लोकसभा मतदानाआधी रूट मार्च

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News

Next Post

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्यांचे वाटप, मतदारसंघातील निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Lok Sabha

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्यांचे वाटप, मतदारसंघातील निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.