मावळ तालुक्यातील दांरुब्रे गावातील उत्कृष्ट क्रिकेटपटू मिलिंद वसंत भोंडवे यांचे क्रिकेट खेळताना निधन झाले आहे. सांगवी येथे शुक्रवारी (दि. 24 मे) क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. या आकस्मिक घटनेने भोंडवे कुटुंब आणि दारूंब्रे गावावर शोककळा पसरली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीनुसार पिंपरी-चिंचवड येथील सांगवीत पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचा शुक्रवारी (दि. 24 मे) तिसरा दिवस होता. शुक्रवारी दुपारी मिलिंद भोंडवे यांच्या संघाचा सामना सुरु होता. त्या सामन्यामध्ये मिलिंद गोलंदाजी करत होते. गोलंदाजी करत असतानाच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते मैदानावर पडले. ( cricketer died due to heart attack while playing match Pimpri Chinchwad )
मिलिंद यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मिलिंद भोंडवे हे उत्तम क्रिकेटर होतेच, परंतू त्यांचे व्यक्तिमत्व देखील सर्वांना हवेसे होतं. त्यांच्या निधनावर सर्व क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
अधिक वाचा –
– शिक्षणाला वय नसते.. मावळमध्ये 58 वर्षांच्या आजीबाई झाल्या बारावी पास ! मार्क पाहून तुम्हीही म्हणाल, आज्जी ‘अभिनंदन’
– पवना ज्युनिअर कॉलेजची उज्वल निकालाची परंपरा कायम, सलग तिसऱ्या वर्षी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के, वाचा अधिक
– मतमोजणीची तयारी झाली ! मावळ लोकसभेची ‘इथे’ होणार मतमोजणी, काय आहेत नियम ? वाचा सविस्तर