मागील काही दिवस मावळ तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि राज्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर आता खासा मान्सून केरळ राज्यात दाखल झाला असून त्याची वाटचाल चांगल्या प्रकारे सुरु आहे. येत्या 8 ते 9 तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या मावळ तालुक्यात शेतीच्या मशागतीची कामे लगबगीने सुरू असून पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुका हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. मावळ तालुक्यातील शेतकरी हे भाताची लागवड करतात. त्यामुळे पेरणीसाठी पारंपारिक पद्धतीने शेताची भाजणी करून पेरणीसाठी शेत तयार करणे, किंवा आता अलीकडे गादी वाफ्यावर रोपवाटिका तयार करणे अथवा एसआरटी अशा इतर पद्धतीनेही भाताची लागवड केली जात असल्याने शेतकरी त्यानुसार शेतीच्या मशागतीच्या कामात गुंतल्याचे दिसत आहे.
- यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून योग्यप्रकारे खरिपाचे नियोजन सुरू केले. तसेच शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिच्या बियाणांचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवां केंद्रांद्वारे सुरू करण्यात आला आहे. सध्या भातशेतीत मजूर टंचाई जाणवत असल्याने शेतीच्या मशागतीपासून ते अगदी पेरणी ते पुढे लागवड वगैरे पर्यंत शेतीत यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा भर असल्याचे दिसत आहे.
मावळ तालुक्यात कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक शेती, यांत्रिकीकरणाद्वारे शेती, भात उत्पादन व भात लागवडीच्या आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ( Pre-monsoon cultivation work in Maval taluka sowing preparations are complete )
अधिक वाचा –
– मावळ खरेदी-विक्री संघ होणार मजबूत ! पदाधिकाऱ्यांचा बारामती अभ्यास दौरा पूर्ण, नवीन प्रकल्पांतून संघाचा होणार कायापालट
– तब्बल 206 प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्यानधारणा सुरू । Prime Minister Narendra Modi Meditation
– पाण्याशी मस्ती अंगाशी आली… कासारसाई धरणात बुडून दोन तरूणांचा दुर्दैवी मृत्यू !