व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतील विविध मार्गांवरील वाहतूक कोंडीवर तात्पुरता उपाय ; अवजड वाहनांवरील बंदी 2 तासांनी वाढवली

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 4, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर, शहर
Traffic jam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहर आणि हद्दीतील मार्गावर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील अवजड वाहनांवरील बंदीचा कालावधी आता 2 तासांनी वाढविण्यात आला आहे.

यापूर्वी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत अशी बंदी अवजड वाहनांना होती. आता ही वेळ वाढवून सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत अशी करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चाकण, भोसरी, महाळुंगे, तळेगाव दाभाडे, हिंजवडी, तळवडे, वाकड, देहू रोड आणि आळंदी यांसारख्या अनेक भागांमध्ये नागरिकांनी वाहतूक कोंडीच्या वारंवार तक्रारी केल्या होत्या.

याशिवाय जुना मुंबई-पुणे महामार्ग, कात्रज-देहू रोड बायपास आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झाली असून नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेच्या म्हणण्यानुसार, अवजड आणि हळू चालणाऱ्या वाहनांवर बंदीची वेळ वाढवल्यामुळे शहरातील वाहतुकीची स्थिती सुधारण्यास मदत होईल. त्यामुळेच अवजड वाहनांवरील बंदीची वेळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

वाहन चोरी करणाऱ्यांना अटक, दोन गुन्ह्यांची झाली उकल, तळेगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई । Maval Crime

Next Post

गुडन्यूज ! पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन रित्या जमा ; चेक करा तुमचे खाते

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
PM-Kisan-Samman-Nidhi

गुडन्यूज ! पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाईन रित्या जमा ; चेक करा तुमचे खाते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.