मावळ मधील एकूण 25 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विजय साजरा करत हॅट्रिक साधली. महायुती उमेदवार (शिवसेना एकनाथ शिंदे गट) श्रीरंग बारणे यांना 6,92101 मते मिळाली. त्यांनी 96 हजार मतांनी संजोग वाघेरे यांचा पराभव केला.
आप्पा आले पण कुठून ? श्रीरंग बारणेंना कोणत्या विधानसभेत किती मतदान ? संजोग वाघेरेंनी कुठे दमवलं ? वाचा सविस्तर
अंतिम निकाल जाहीर ! श्रीरंग बारणे 96 हजार 615 मतांनी विजयी, मावळात कोणत्या उमेदवाराला किती मते? वाचा एका क्लिकवर
आप्पांनी हॅटट्रीक केलीच ! मावळ लोकसभेतून श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय, संजोग वाघेरे यांचा मोठ्या फरकाने पराभव
मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे.
20व्या फेरीनंतर श्रीरंग बारणे यांच्याकडे 95 हजारांची विजयी आघाडी –
मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे 20 व्या फेरी अखेर 95,246 मतांनी आघाडीवर आहेत.
20व्या फेरीत
श्रीरंग बारणे – 5,94682
संजोग वाघेरे – 4,99436
श्रीरंग बारणे यांना 60 हजारांची आघाडी –
श्रीरंग बारणे यांना मिळत असलेले मतांचे अधिक्य हे कमी होत नसून ते प्रत्येक फेरीत वाढताना दिसत आहे. सद्यस्थितीत श्रीरंग बारणे यांना 60 हजार 75 मतांची आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. मावळ लोकसभेत काँटे की टक्कर होईल, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र प्रत्यक्षात श्रीरंग बारणे यांची गाडी सुसाट सुटल्याची दिसत असून फेरीगणित त्यांच्या खात्यातील लीड वाढत आहे.
मावळ लोकसभा निकाल अपडेट
श्रीरंग बारणे 410412 मते ( आघाडीवर)
संजोग वाघेरे यांना 350337 मते
माधवी नरेश जोशी 15665 मते
श्रीरंग बारणे 60075 मतांनी आघाडीवर
मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी – 10वी फेरी
श्रीरंग बारणे ( शिवसेना एकनाथ शिंदे गट ) – 27,620
( एकूण मतदान – 2,99,961 )
संजोग वाघिरे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) – 23,764
( एकूण मतदान – 2,55,233 )
महायुतीचे श्रीरंग बारणे एकूण 44,728 मतांनी आघाडीवर
मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी – आठवी फेरी
श्रीरंग बारणे ( शिवसेना एकनाथ शिंदे गट ) – 26637
( एकूण मतदान – 2,46,653 )
संजोग वाघिरे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) – 28277
( एकूण मतदान – 2,03,604 )
महायुतीचे श्रीरंग बारणे एकूण 43,049 मतांनी आघाडीवर
मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी – सातवी फेरी
श्रीरंग बारणे ( शिवसेना एकनाथ शिंदे गट ) – 30101
( एकूण मतदान – 2,20,016 )
संजोग वाघिरे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) – 25106
( एकूण मतदान – 1,75,327 )
महायुतीचे श्रीरंग बारणे एकूण 44,689 मतांनी आघाडीवर
श्रीरंग बारणेंकडे 29,536 मतांची आघाडी –
मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी बालेवाडी पुणे – पाचवी फेरी
श्रीरंग बारणे 33242
( एकूण मतदान – 1,56,953 )
संजोग वाघिरे 24392
( एकूण मतदान – 1,27,417 )
महायुतीचे श्रीरंग बारणे एकूण 29,536 मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरीअखेर श्रीरंग बारणे आघाडीवर –
मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे हे मोठी आघाडी घेताना दिसत आहेत. सद्यस्थिती श्रीरंग बारणे यांच्याकडे 20 हजारपेक्षा अधिकची आघाडी असल्याचे दिसत आहे. संजोग वाघेरे यांना मावळ आणि कर्जतमधून आघाडी मिळत आहे. परंतू इतर सर्व ठिकाणी श्रीरंग बारणे यांनाच आघाडी मिळताना दिसत आहे.
मावळ लोकसभा निकाल अपडेट
श्रीरंग बारणे १,१९,७६४ मते
संजोग वाघेरे पाटील ९९,०७४ मते
श्रीरंग बारणे २०,६९० मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरीनंतर
महायुती श्रीरंग बारणे – १ लाख ३९ हजार मते
महाआघाडी संजोग वाघेरे – ८३ हजार ९८२ मते
बारणे आघाडी – १६ हजार ५७ मतांची आघाडी
श्रीरंग बारणेंकडे तब्बल 7288 मतांची आघाडी –
मावळ लोकसभा मतदारसंघात कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. संजोग वाघेरे यांना मागे टाकत श्रीरंग बारणे यांनी तब्बल 7288 मतांची आघाडी घेतल्याचे समजत आहे. श्रीरंग बारणे हे तिसऱ्या टर्मसाठी मैदानात असून विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांची ताकद आता निकालात दिसून येत आहे. श्रीरंग बारणे यांनी घेतलेली मोठी आघाडी आता संजोग वाघेरेंना मोडून काढावी लागेल. ही परिस्थिती बदलेले असा अंदाज वर्तवला जात आहे.
मावळ लोकसभा आकेडवारी :
श्रीरंग बारणे – 68147 मते (आघाडीवर)
संजोग वाघेरे – 60859 मते
माधवी जोशी – 1693 मते
श्रीरंग बारणे यांना 7288 मतांची आघाडी
पहिल्या फेरीत बारणे आघाडीवर –
पोस्टल मतमोजणीत संजोग वाघेरे यांनी घेतलेली आघाडी श्रीरंग बारणे यांनी ईव्हीएम मतमोजणीत मोडून काढली आहे. पहिल्या फेरीत श्रीरंग बारणे यांनी मोठी मुसंडी मारली आहे. मावळ लोकसभेच्या पहिल्या फेरी अखेर शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी 3736 मतांची आघाडी घेतल्याचे समजत आहे.
मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी बालेवाडी पुणे
पहिली फेरी
श्रीरंग बारणे 31195
संजोग वाघेरे 25464
महायुतीचे श्रीरंग बारणे 5731 मतांनी आघाडीवर
मावळ लोकसभा निवडणुक मतमोजणी बालेवाडी पुणे
दुसरी फेरी
श्रीरंग बारणे 30226
( एकूण मतदान – 61421)
संजोग वाघिरे 27660
( एकूण मतदान – 53124 )
महायुतीचे श्रीरंग बारणे 2566 मतांनी आघाडीवर
पोस्टल मतदानात संजोग वाघेरे यांची आघाडी –
मंगळवारी (दि. 4 जून) मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला पोस्टल मतदानाची मोजणी करण्यात आली. या मतदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे हे आघाडीवर असल्याचे समजत आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे पिछाडीवर असल्याचे समजत आहे. अजून प्रमुख मतदानाची मोजणी बाकी आहे. परंतू पोस्टल मतदानात मात्र ठाकरेंच्या उमेदवाराने बाजी मारल्याचे दिसत आहे. ( Maval Lok Sabha Constituency Election 2024 Result Counting Live Updates in Marathi Sanjog Waghere Shrirang Barane Shiv Sena )
लोकसभा निवडणूक 2024 चे मतदान पूर्ण झाल्यानंतर आज देशभरात सर्व ठिकाणच्या मतदारसंघातील मतमोजणी होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात सरळ लढत झाली होती. मावळ लोकसभा मतदारसंघातही कडवी लढत पाहायला मिळाली होती. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने आले होते. मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्या थेट लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात शिंदे आणि ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मावळच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. पुण्यातील बालेवाडी येथे मावळ लोकसभेची मतमोजणी होत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बालेवाडी येथे मतमोजणी ! निकालासाठी जाणारे कार्यकर्ते आणि सामान्यांसाठी महत्वाची अपडेट, वाहतूक मार्गात मोठा बदल, जाणून घ्या
– महत्वाची बातमी ! नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार