राज्यात पुन्हा एकदा निवडणूकीचा बिगूल वाजला आहे. राज्यातील तब्बल 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सर्व ठिकणा थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. येत्या 18 डिसेंबर रोजी यासाठी मतदान होणार आहे. तर, 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ( Gram Panchayat Election 2022 7751 Gram Panchayat elections Program announced by Election Commision Of Maharashtra )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यात पहिल्या टप्प्यात 7600 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या होत्या आता दुसऱ्या टप्प्यात 7700 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राज्यातील कोल्हापूर, सांगली, नांदेड, अहमदनगर, अकोला अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, नाशिक, वाशिम, यवतमाळ अशा 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली.
अधिक वाचा –