श्री क्षेत्र आळंदी ( Alandi ) येथे कार्तिकी यात्रेनिमित्त ( Kartiki Ekadashi ) राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. तसेच, यात्रेच्या निमित्ताने कित्येक दिवस अगोदरच वारकरी बांधव पायी दिंडीद्वारे आळंदीच्या दिशेने मार्गस्थ होत असतात. मात्र, अलिकडे पायी दिंडीतील वारकऱ्यांसोबत होणाऱ्या अपघातांची वाढती मालिका पाहता आणि तालुक्यात ( Maval Taluka ) गतवर्षी झालेली दुर्घटना पाहता, माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर यांनी पोलिसांना विशेष निवेदन दिले आहे. या निवेदनातून त्यांनी पायी दिंड्यांना अचूक वाहतूक नियोजन आणि पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. ( Vadgaon Maval Gulab Mhalaskar Demand For Police Protection To Dindi )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कोकण भागातून येणाऱ्या पायी दिंड्यांना वाहतूक संरक्षण मिळावे – म्हाळसकर
गुलाब काका म्हाळसकर यांनी वडगाव मावळ पोलिस यांना निवेदन पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी, “आळंदी देवाची या ठिकाणी सालाबाद प्रमाणे कार्तिकी एकादशी मोठ्या आनंदात, उत्साहाने साजरी केली जाते. त्यासाठी कार्तिकी एकादशी निमित्त कोकण भागातून अनेक पायी दिंड्या येत असतात. ज्या मावळ तालुक्यातून मार्गक्रमन करत असतात. परंतू मागील वर्षी साते (तालुका मावळ) या ठिकाणी पायी चालणाऱ्या दिंडीमध्ये पिक अप व्हॅन घुसल्याने मोठा अपघात ( Maval Taluka Dindhi Accident )घडला होता. या अपघातात अनेक वारकरी गंभीर जखमी झाले होते, तर काही वारकऱ्यांना प्राणास मुकावे लागले होते.
तसेच, अलिकडेच कार्तिकी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत एक कार घुसून भयंकर अपघात झाला होता. सांगोला येथे झालेल्या त्या भीषण अपघातात सात वारकरी मृत पावले होते. या सर्व घडामोडी पाहता, यावर्षी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असून त्यादृष्टीने उपाययोजना व्हाव्यात, यासाठी यंदा आळंदी कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त कोकण भागातून येणाऱ्या पायी दिंडींना वाहतूक संरक्षण मिळावे”, अशी विनंती गुलाबकाका म्हाळसकर यांनी केली आहे.
हेही वाचा – कालभैरव जयंती कार्तिक उत्सवानिमित्ताने वडगावमध्ये ज्ञानामृत सोहळा I Vadgaon Maval
त्याचप्रमाणे, यंदा 20 नोव्हेंबर रोजी आळंदी येथे कार्तिकी यात्रा असून त्यासाठी आळंदीकडे जाणाऱ्या दिंड्यांचा मावळ तालुक्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातून जाणारा महामार्ग यावरुन प्रवास करणाऱ्या दिंड्यांना योग्य ते वाहतूक नियोजन आणि पोलिस संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे गुलाबकाका म्हाळसकर यांनी म्हटले आहे. ( Vadgaon Maval Gulab Mhalaskar Demand For Police Protection To Dindi )
अधिक वाचा –
– PHOTO : सातारा दौऱ्यावर असताना बाळा भेगडे यांनी घेतली खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट
– थाळीफेक स्पर्धेत मावळ तालुक्यातील सार्थक घोजगेला रौप्य पदक, आमदार शेळकेंनी थोपटली पाठ
– पवनानगरमधील साम्राज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भाऊ मोरे यांचे दुःखद निधन, मित्रपरिवार शोकसागरात
View this post on Instagram