जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा यंदा 339 वा पालखी सोहळा आहे. यावर्षी 28 जून रोजी तुकोबांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात होणार आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित राहावेत, यासाठी संस्थानच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मंगळवारी निमंत्रण देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही हे निमंत्रण आदरपूर्वक स्विकारले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्रथेनुसार तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी विधीवत पुजा पार पडते. त्यानंतर अंदाजे दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान पालखीचे प्रस्थान होत असते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून ते पालखी प्रस्थान सोहळ्यास श्रीक्षेत्र देहूगाव मध्ये उपस्थित राहणार आहेत. ( CM Eknath Shinde will attend Palkhi Sohla of Sant Tukaram Maharaj at Dehu )
श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी मंगळवारी आपल्या शिष्टमंडळासह मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पुजेचे निमंत्रण दिले. यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार भरत गोगावले, वारकरी सांप्रदायिक अण्णा बोडके, देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, पालखी प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज बोडके, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास मोरे तसेच चोपदार हे यावेळी उपस्थीत होते.
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक,
विठ्ठलाची एक देखलिया !राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदेसाहेब यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे निमंत्रण मंगळवारी संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्थांच्या वतीने देण्यात आले. यावेळी त्यांना तुकाराम गाथा आणि… pic.twitter.com/ivaRolyXnI
— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) June 12, 2024
येत्या 27 – 28 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंतू त्यातही दोन तास वेळ काढून आपण पालखी सोहळ्यासाठी अवश्य हजर राहू असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली.
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुणी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री किंवा बोगस वाण विक्री करत असल्यास ‘इथे’ करा तक्रार
– आनंदवार्ता ! अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर । Maharashtra Sadan In Ayodhya
– ‘शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या’ – अजित पवार