व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा यंदा 339 वा पालखी सोहळा आहे. यावर्षी 28 जून रोजी तुकोबांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात होणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 12, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
Palkhi Sohla of Sant Tukaram Maharaj at Dehu

Photo Courtesy : Team Dainik Maval


जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा यंदा 339 वा पालखी सोहळा आहे. यावर्षी 28 जून रोजी तुकोबांच्या पालखी सोहळ्याची सुरुवात होणार आहे. तुकोबांच्या पालखी सोहळ्यासाठी यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित राहावेत, यासाठी संस्थानच्या वतीने मुख्यमंत्र्यांना मंगळवारी निमंत्रण देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही हे निमंत्रण आदरपूर्वक स्विकारले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्रथेनुसार तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी विधीवत पुजा पार पडते. त्यानंतर अंदाजे दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान पालखीचे प्रस्थान होत असते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून ते पालखी प्रस्थान सोहळ्यास श्रीक्षेत्र देहूगाव मध्ये उपस्थित राहणार आहेत. ( CM Eknath Shinde will attend Palkhi Sohla of Sant Tukaram Maharaj at Dehu )

श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी मंगळवारी आपल्या शिष्टमंडळासह मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पुजेचे निमंत्रण दिले. यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार भरत गोगावले, वारकरी सांप्रदायिक अण्णा बोडके, देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे, पालखी प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज बोडके, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास मोरे तसेच चोपदार हे यावेळी उपस्थीत होते.

तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक,
विठ्ठलाची एक देखलिया !

राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदेसाहेब यांना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे निमंत्रण मंगळवारी संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्थांच्या वतीने देण्यात आले. यावेळी त्यांना तुकाराम गाथा आणि… pic.twitter.com/ivaRolyXnI

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) June 12, 2024

येत्या 27 – 28 जून पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंतू त्यातही दोन तास वेळ काढून आपण पालखी सोहळ्यासाठी अवश्य हजर राहू असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली.

अधिक वाचा –
– शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! कुणी बी-बियाण्यांची चढ्या भावाने विक्री किंवा बोगस वाण विक्री करत असल्यास ‘इथे’ करा तक्रार
– आनंदवार्ता ! अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर । Maharashtra Sadan In Ayodhya
– ‘शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या’ – अजित पवार


Previous Post

शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का ? कॅबिनेट मंत्रिपद हुकल्यानंतर खासदार श्रीरंग बारणेंची संतप्त प्रतिक्रिया । Shiv Sena Maval MP Shrirang Barne

Next Post

मावळमधील विसापूर गडावरील शिवमंदिराचा आठवा जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात साजरा । Visapur Fort

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shiva temple at Visapur Fort

मावळमधील विसापूर गडावरील शिवमंदिराचा आठवा जीर्णोद्धार वर्धापनदिन उत्साहात साजरा । Visapur Fort

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.